Number of languages by country: भारतात दर तीन मैलांवर भाषा बदलते असे म्हणतात यानुसार भारताचे क्षेत्रफळ पाहता भारतात जगातील सर्वाधिक भाषा बोलल्या जात असतील असे आपल्यालाही वाटत असेल हो ना? पण तुम्ही चुकताय. अलीकडेच वर्ल्ड ऑफ स्टॅस्टिक या अकाउंटवर जगभरात ज्या देशांमध्ये सर्वाधिक भाषा बोलल्या जातात अशा देशांची यादी सादर करण्यात आली आणि त्यानुसार आपला भारत देश टॉप तीन मध्येही येत नाही. पण मग नेमकं पहिल्या क्रमांकावर आहे तरी कोण आणि तिथे नेमक्या किती भाषा वापरल्या जातात हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? चला तर मग सविस्तर आकडेवारी पाहूया…

ट्विटरवरील वर्ल्ड ऑफ स्टॅस्टिक या अकाउंटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक भाषा बोलणारा देश भारताच्या तुलनेत क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबत अगदीच लहान आहे. या देशाचे नाव पापुआ न्यू गिनी. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या सन्मानाने याच देशात गौरवण्यात आलं होतं. या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडले हा व्हिडिओही प्रचंड चर्चेत होता. या देशात तब्बल ८४० भाषा संभाषणात वापरल्या जातात. तर यापाठोपाठ इंडोनेशिया व नायजेरिया या यादीत समावेश आहे.

दरम्यान, भारत या देशांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असल्याचे दिसतेय. वर्ल्ड ऑफ स्टॅस्टिकच्या माहितीनुसार, भारतात तब्बल ४५३ भाषा बोलल्या जातात तर दुसऱ्या क्रमांकावरील इंडोनेशियामध्ये ७१० व तिसऱ्या क्रमांकावरील नायजेरिया मध्ये ५२४ भाषा बोलल्या जातात.

सर्वाधिक भाषा संभाषणात वापरणाऱ्या देशांची यादी

हे ही वाचा<<किती पगार असल्यावर घर-फ्लॅट घेणे आहे योग्य? ‘हा’ आहे फॉर्म्युला..नाहीतर आयुष्यभर EMI च भरावा लागू शकतो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वर्ल्ड ऑफ स्टॅस्टिक हे अकाउंट अशा आकडेवाऱ्यांचे रेकॉर्ड सादर करण्यासाठी ओळखले जाते. या अकाउंटवर २ मिलियनहुन अधिक फॉलोवर्स आहेत. याच अकाउंटने जगातील सर्वात प्रसिद्ध नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर पुन्हा आल्याची माहिती अलीकडेच दिली होती.