Who is St Valentine : सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक उत्साहात साजरा केला जात आहे. प्रेमाच्या या आठवड्यात अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. फुले, चॉकलेट, टेडी, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत प्रिय व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त केले जाते. पण तुम्हाला माहितीये का? ‘व्हॅलेंटाईन डे’ हे या दिवसाचं नाव कसं पडलं? व्हॅलेंटाईन नावाची व्यक्ती कोण होती? आज आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. (who is St Valentine interesting story behind valentine day is celebrated)

काही इतिहासकारांच्या मते, हा दिवस प्राचीन रोमन उत्सव लुपरकॅलियाशी संबंधित आहे. लुपरकॅलिया हा उत्सव दरवर्षी रोमन लोकांडून १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान वसंत ऋतूचे व प्रजनन काळाचे आगमन म्हणून साजरा केला जात असे.
जसजसा ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत गेला, तसतशी मूर्तिपूजा कमी होत गेली. इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या शेवटी पॉप गेलॅसियस याने हा उत्सव बेकायदा ठरवत संत व्हॅलेंटाईन यांच्या नावावरून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात केली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, संत व्हॅलेंटाईन कोण होते? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

संत व्हॅलेंटाईन कोण होते?

संत व्हॅलेंटाईन हे तिसऱ्या शतकातील रोमन कॅथोलिक धर्मगुरू होते आणि त्यांचे निधन १४ फेब्रुवारी इसवी सन २७० रोजी झाले. त्यामुळे या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो.

एका कथेत, संत व्हॅलेंटाईन हे एक रोमन धर्मगुरू होते. ज्यांनी मूर्तिपूजा धर्मात स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे सम्राट क्लॉडियस २ ने इसवी सन २७० मध्ये त्यांना मृत्युदंड दिला होता. त्यांच्या फाशीपूर्वी त्यांनी जेलरच्या मुलीला बरे केले होते. एका आख्यायिकेत सांगितल्याप्रमाणे, ते नंतर त्या मुलीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या फाशीच्या दिवशी तिला ‘तुझ्या व्हॅलेंटाईनकडून’ (From Your valentine) असे स्वाक्षरी केलेले एक पत्र लिहिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या एका कथेत सांगितल्याप्रमाणे, संत व्हॅलेंटाईन यांनी गुप्तपणे सैनिकांची लग्ने करून दिली, ज्यांना सम्राट क्लॉडियस २ च्या आदेशानुसार लग्न करण्यास मनाई होती. त्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली.