आपण बऱ्याचवेळा ऐकलं असेल की साप चंदनाच्या झाडावर राहतात आणि चंदनाच्या झाडाला लिपटून असतात. पण यामागे असं कोणतं कारण आहे की साप चंदनाच्याच झाडावर राहतात. खरं तर यामागे एक रंजक कारण आहे. जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग जाणून घेऊया..

सापांची वास घेण्याची शक्ती ही चांगली असते

साप फक्त चंदनाच्या झाडावरच नाही तर चमेली आणि आणखी इतर सुगंधी झाडांवर देखील राहतात. तुम्हाला माहित असेलच ही झाडे सुगंधी असतात. या झाडांचा सुगंध सापांना आवडतो असे मानले जाते. विज्ञानाने हे सिद्ध केलंय की, सापाला कोणत्याही गोष्टीचा वास चांगल्या प्रकारे घेता येतो, आणि त्याची वास घेण्याची शक्ती ही चांगली असते. साप नाकाच्या आणि जिभेच्या वरच्या बाजूने वास घेऊ शकतात. खरं तर साप जेव्हा जेव्हा त्याची जीभ बाहेर काढतो तेव्हा तो आजूबाजूच्या वातावरणाचा वास घेण्यासाठी काढत असतो. या वासाच्या आधारावर तो सुगंध येणाऱ्या झाडांजवळ जातो आणि त्याठिकाणी राहतो.

( हे ही वाचा: ‘हे’ आहे जगातील सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्टेशन; वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण साप फक्त सुगंधासाठी या झाडांजवळ जात नाही, तर सापांना थंड आणि अंधाराच्या ठिकाणी राहायला जास्त आवडतं. हे प्राणी एखाद थंड ठिकाण राहण्यासाठी पसंत करतात. ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान हे कंट्रोल राहील. चंदनाच्या झाडाचे तापमान खूप कमी असते त्यामुळे साप या झाडांवर राहणे पसंत करतात.