Bombil-Bombay Duck मुंबईकरांचा लाडका मासा म्हणजे ‘बोंबील’, खरपूस, खमंग भाजलेला बोंबील अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केवळ मुंबईकरांचाच नाही तर संपूर्ण भारतालाच या माशाची चटक आहे. या माशाचे शास्त्रीय नाव harpadon nehereus- हरपडॉन नेहेरियस असे आहे. या माशाच्या चवीची भुरळ केवळ भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगाला आहे. मुंबईकरांच्या हा रूचकर बोंबील हा इंग्रजांसाठी ‘बॉम्बे डक’ होता. त्यामुळे ज्यांनी हा मासा प्रत्यक्ष पाहिलेला नाही, त्यांना हे नाव ऐकताच, ही मुंबईतील बदकाची जात असल्याचा गैरसमज होतो. त्यामुळे मुंबईच्या या जलचाराला ‘बॉम्बे डक’ का म्हणतात, हे जाणून घेणे रंजक ठरणारे आहे. 

अधिक वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

इंग्रजांचे बोंबील प्रेम 

इंग्रजांना बॉम्बे डक अतिशय प्रिय होते, किंबहुना त्यांनी भारत सोडून गेल्यानंतरही भारतातून युरोपात बोंबिलाची आयात केली. १९७७ साली युरोपियन कमिशनने स्वच्छतेच्या कायद्यांचे पालन न केल्यामुळे या माशांवर बंदी घातली, तेव्हा ब्रिटीश व्यापारी ‘डेव्हिड डेलेनी’ यांनी बंदी रद्द करण्यासाठी चार वर्षे लढा दिला होता. हे मासे एकतर ताजे खाल्ले जातात किंवा निर्यातीच्या दृष्टिकोनातून अधिक काळ टिकून राहावे म्हणून समुद्रकिनाऱ्यावर उन्हात वाळवले जातात. हे फ्रीजिंग आणि कॅनिंग ऐवजी खुल्या हवेत वाळवत असल्याने युरोपियन कमिशनला ते मांस जीवाणूजन्य दूषित होण्याची भीती वाटली आणि त्यांनी त्याच्या आयातीवर बंदी घातली होती. याच बंदीला विरोध करण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालयाने “सेव्ह बॉम्बे डक” मोहीम सुरू केली होती आणि युरोपियन कमिशनला वाळलेल्या बोंबलासाठीचे नियम समायोजित करण्याचे आवाहन केले. 

अधिक वाचा: मृत्यूनंतर खरंच जीवन आहे का? काय सांगतेय नवीन संशोधन?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोंबील ‘बॉम्बे डक’ कसा झाला?

भारतात रेल्वेचा शोध लागला, त्या वेळेस या माशाची निर्यात मुंबईतून बंगालमध्ये होत होती. बंगालमध्ये हा मासा अतिशय प्रिय होता. या माशाची निर्यात ट्रेनच्या माध्यमातून होत असे. त्यामुळेच या माशाला ‘बॉम्बे मेल फिश’ किंवा ‘बॉम्बे डाक’ असे संबोधले जात होते. याच ‘बॉम्बे डाक’चे रूपांतर पुढे ‘बॉम्बे डक’ मध्ये झाले. काहींच्या मते बोंबलाला ब्रिटिशांनी हे नाव दिले. त्यांना या ट्रेनमधून येणाऱ्या या माशांचा वास सहन होत नव्हता. स्थानिक संदर्भानुसार ‘बॉम्बे डक’ हा शब्द सर्वप्रथम रॉबर्ट क्लाइव्हने वापरला होता, त्याने बंगालच्या विजयादरम्यान या माशाचा एक तुकडा चाखला होता. मुंबईहून छावण्यांमध्ये येणार्‍या वृत्तपत्रे आणि मेल (बंगाली भाषेत डाक) यांना या माशांचा वास येत असे. त्यामुळेच त्याने या माशाचे नामकरण ‘बॉम्बे डक’ केले, असे मानले जाते. रॉबर्ट क्लाइव्ह याच्या पुस्तकात (१८२९), त्याने या माशाच्या नावाचा उल्लेख केला आहे. असे असले तरी काही अभ्यासक हे नाव आधीपासून अस्तित्त्वात असल्याचे मानतात, मात्र त्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.