रस्त्यावर जाता- येता अनेक मोठे मॅनहोल तुम्ही पाहिलेच असतील. हे मॅनहोल पद्धतशीरपणे झाकलेले असतात. पण अनेकदा असा प्रश्न पडतो की, हे मॅनहोल का बनवले जातात. तर यामागचं कारण म्हणजे, वेगवेगळ्या ठिकाणचं सांडपाणी वाहून नेण्यासाठी शहरांमध्ये एक ड्रेनेज सिस्टीम असते. हे ड्रेनेज भूमिगत असतात. याच ड्रेनेज लाईनच्या काही अंतरावर मॅनहोल्स केलेले असतात. या मॅनहोलच्या मदतीने शहरातील सीवर आणि ड्रेनेजसंबंधीत इंजिनियर, लेबर आणि इंस्पेक्टर आदी दुरुस्तीची कामं सहज पूर्ण करता येतात. पावसाचं पाणी मोठ्याप्रमाणात साचलं की ही मॅनहोलची झाकणं ओपन केली जातात. यामुळे पावसात आपण अनेकदा मॅनहोलमध्ये पडून अपघात झाल्याच्या घटना ऐकतो. पण तुम्हीला कधी असा प्रश्न पडला आहे का की, मॅनहोलची झाकणं नेहमी गोल आकाराचीच का असतात? त्यामागे नेमकं कारण काय? .. चला त्याबद्दल जाणून घेऊया…

मॅनहोलच झाकण गोल का असते?

मॅनहोलचे झाकणं नेहमी गोलकार ठेवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे अपघात रोखणे. मॅनहोलचा आकार गोलाकार असल्यामुळे त्याच्यावरील झाकणंही गोलाकारचं केले जाते, जेणेकरून ते झाकणं पडता कामा नये. त्यामागे केवळ हेच कारणं नाही तर अनेक प्रॅक्टिकल, फंक्शनल आणि इंजिनियरिंग इत्यादी कारणे देखील आहेत.

याशिवाय मॅनहोलवरील गोलाकार झाकणं काढून टाकल्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे खूप सोपे असल्याचे कारणंही यामागे सांगितले जाते. तसेच मॅनहोलचं गोल आकारच झाकण कमी खर्चिक आणि अधिक मजबूत असते. वजनाने हे झाकण जड असते. पण गोलाकार असल्याने ते झाकण ढकलत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. हेच झाकण गोलऐवजी चौकोनी, त्रिकोणी आकाराचे असते तर एका ठिकाणाहून दुसऱ्या नेणे सोपे झाले नसते. तसेच ते झाकणं सहजपणे तुटण्याची शक्यता जास्त असते. अशाप्रकारे झाकणाचं नुकसान झाल तर त्याचा पुनर्वापर करणं अशक्य होत नाही.

त्याचे वजन किती असते?

मॅकहोल हे अतिशय जड धातूपासून बनवलेल्या एका प्लेट्सने अर्थात झाकणाने झाकलेले असतात, ते झाकण वजनाने जड असले तरी सहजपणे उचलून बाजूला करता येते. या मॅनहोलच्या झाकणाचे वजन सामान्यत: ९० ते १३९ किलो दरम्यान असते. अनेकदा हे काँक्रीट किंवा कास्ट आयरनने बनवलेले असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मॅनहोल झाकणाचे काय फायदे काय असतात?

मॅनहोल ज्या बाजूने ओपन करतो त्याच्या चारही बाजूला एक लिप असते ज्यामुळे झाकण सहज फिट होते. या मजबूत झाकणामुळे रस्त्यावरून जाणारे – येणारे पादचारी मॅनहोलमध्ये पडण्यापासून वाचतात. मॅनहोलवर हेच झाकण चौकोनी असत तर व्यवस्थित बसण्यची शक्यता कमी असते आणि ते सहजपणं खाली पडण्याची भीती असते. पण गोलाकार झाकणामुळे कोणताही कचरा किंवा मलबा त्यात साचण्यापासून रोखता येतो. त्यामुळे जमिनीखालील गटार आणि पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहते.