scorecardresearch

Petrol-Disel Engine: पेट्रोल इंजिन पावरफुल, पण मोठ्या गाड्यांमध्ये डिझेलच का वापरल जात? जाणून घ्या काय आहे कारण

मोठ्या गाड्यांमध्ये डिझेल इंजिनचा का वापर केला जातो जाणून घ्या.

why petrol engine are used in small car and diesel engine are used in big car
डिझेल इंजिनची वाहन जास्त का वापरली जातात? (लोकसत्ता संग्रहित)

जेव्हा कोणीही कार खरेदी करण्याचा विचार करतो, तेव्हा पेट्रोल इंजिन कार घ्यायची की डिझेल असा प्रश्न पडतो. यावर अनेकदा पेट्रोल इंजिन कार मजबूत असल्याचे उत्तर येते. मात्र पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे अनेक जण आता डिझेल इंजिन कार खरेदी करतात. पण डिझेल इंजिन वाहनांपेक्षा पेट्रोल इंजिन कारचं बेस्ट मानल्या जातात. पण तुम्ही पाहिलं का, सर्व अवजड वाहनं ही डिझेल इंजिनची असतात. त्यामुळे अनेकदा प्रश्न पडलतो की ,पेट्रोल इंजिन वाहनं मजबूत असतानाही अवजड सामान वाहून येण्यासाठी आणि दूरचे अंतर कापण्यासाठी नेहमी डिझेल इंजिन वाहनांचाच वापर का केला जातो? तसेच मोठ्या वाहनांमध्ये फक्त डिझेलच का वापरले जाते? जाणून घ्या यामागे नेमक काय कारणं आहे.

पेट्रोल आणि डिझेलमध्ये नेमका फरक काय?

खरतरं, पेट्रोल आणि डिझेल दोन्ही गोष्टी कच्च्या तेलापासून बनवल्या जातात. या कच्च्या तेलापासून इतर अनेक प्रकारचे इंधने बनवली जातात. पण हे कच्चे तेल मुख्यत: दोन विभागात विभागले जाते, एक म्हणजे हलके आणि दुसरे म्हणजे जड. यातील हलक्या भागाला पेट्रोल आणि जड भागाला डिझेल असे म्हटले जाते.

पण मोठ्या वाहनांमध्ये डिझेलचं का वापरले जाते?

पेट्रोलपेक्षा डिझेल जळण्यास फार कठीण असते. यात वाहनांच्या सिलेंडरमधील गरम हवेसाठी खूप जास्त प्रेशरची गरज असते, हे प्रेशर फक्त डिझेलच तयार करु शकते. डिझेलचा हाय प्रेशन हा पेट्रोल इंजिनच्या तुलनेत ५ ते १० पट जास्त असतो. त्यामुळे जड वाहनांमधून कोणत्याही जड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे होते. त्यामुळे मोठ्या वाहनांमध्ये डिझेलचा वापर केला जातो.

दुसरीकडे स्कूटर, मोटारसायकल या छोट्या वाहनांमध्ये कमी प्रेशरची गरजे असते, त्यामुळे तिथे डिझेल वापरणे योग्य नसते. तसेच पेट्रोल जाळण्यास सोपे असते, त्यामुळे लहान वाहनांमध्ये पेट्रोलचा वापर केला जातो.

पेट्रोल आणि डिझेल इंजिनमधील फरक

डिझेल इंजिन हे पेट्रोल इंजिनपेक्षा मोठे असते, ते मोठ्या आणि अवजड वाहनांमध्येच जास्त वापरले जाते. त्यामुळे डिझेल इंजिनमध्ये वेगवेगळे अनेक भाग असतात आणि त्याचा मेंटेनन्स खर्चही जास्त आहे, पण दुसरीकडे पेट्रोल इंजिन लहान असतात आणि त्यातील भागही कमी असतात. तसेच डिझेल इंजिनची वाहनं मायलेज जास्त देतात. त्यामुळे वाहनांमध्ये डिझेल इंजिनचा वापर अधिक केला जातो, तर लहान वाहनांमध्ये पेट्रोल इंजिनचा वापर अधिक केला जातो.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 14:43 IST
ताज्या बातम्या