ठुशी म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येतो तो दागिना. ठुशी म्हणजे गोल मण्यांनी भरलेली वर्तुळाकार माळ. तर चोळी म्हणजे पूर्वी परिधान केला जाणारा स्त्रियांच्या पोशाखातील एक प्रकार ; ज्याला आता ब्लाउज असे संबोधले जाते. पण, तुम्हाला हे माहीत आहे का ? पूर्वी ग्रामीण भागात स्त्रिया साडीवर चोळी परिधान करायच्या, त्याला एक कापडाचा तुकडा लावला जायचा. त्याला सुद्धा ‘ठुशी’, असे म्हंटले जायचे.

तर आज आपण या लेखातून चोळीला लावल्या जाणाऱ्या त्या कापडाच्या तुकड्याला ‘ठुशी’ का म्हटले जायचे. त्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी ठुशी या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. आजकाल ग्रामीण भागांतही महिलांच्या पोशाखातून चोळी गायब झाली आहे. त्यामुळे त्रिवेणी आकार शिकविताना आता चोळीच्या खणाचे उदाहरण देता येत नाही.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

हेही वाचा…‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’… तर ‘भातुकली’ या शब्दाचा नेमका अर्थ काय ? जाणून घ्या

पण, लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार- पूर्वी ग्रामीण भागात चोळीला काखेत एक त्रिकोणी आकाराच्या वेगळ्या कापडाचा तुकडा लावला जात असे. त्यालाच ‘ठुशी’ असे म्हणतात. पूर्वी ही चोळी ग्रामीण भागात स्त्रिया दररोज आवडीने घालायच्या. चोळीच्या या ठुशीचे खरे नाव आहे ‘उबार’. तर या ‘उबार’लाच ‘चोळीचा लग’, असेही म्हटले जाते. हा उबार शब्द आला तो संस्कृत भाषेतून. या शब्दाला संस्कृत भाषेत ‘उब्बाहू’ असे म्हणतात. पण, ठुशी हा शब्द मात्र ग्रामीण भागातील. हा देखणा शब्द ग्रामीण बोलीने मराठी भाषेला दिलेला आहे.

स्त्रियांचा दागिना आणि चोळीवर लावल्या जाणाऱ्या त्रिवेणी आकाराच्या कापडाला जरी ठुशी म्हणत असतील तरी या दोघांचा अर्थ आणि उपयोग वेगवेगळा आहे. पण, दोन्ही स्त्रियांच्या सौंदर्याचाच एक भाग आहेत.