News Flash

कारनामा

पीयूसी याचा अर्थ पोल्यूशन अंडर कंट्रोल. इंजिनमध्ये ज्वलन झाल्यावर जो धूर बाहेर टाकला जातो त्याची चाचणी म्हाणजे पीयूसी.

| September 25, 2014 01:02 am

पीयूसी टेस्ट म्हणजे काय? ही टेस्ट करण्याची गरज का असते?     
– रमेश बहाळकर
*  पीयूसी याचा अर्थ पोल्यूशन अंडर कंट्रोल. इंजिनमध्ये ज्वलन झाल्यावर जो धूर बाहेर टाकला जातो त्याची चाचणी म्हाणजे पीयूसी. या धुरामध्ये अनेक उपद्रवी प्रदूषके असतात, जसे कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनोओक्साइड. पीयूसी टेस्ट याचे धुरातील प्रमाण तपासते आणि योग्य आहे की नाही ते सांगते. ही चाचणी करणे भारत सरकारने सर्व वाहनांना बंधनकारक केले आहे. ही टेस्ट केल्याची एक पावती वाहनधारकाला बाळगावी लागते, जी पीयूसी टेस्ट केल्याचा पुरावा असते. वातावरणातील प्रदूषण कमी करण्याहेतू ही टेस्ट खूप महत्त्वाची ठरते.
कार चालवताना जास्तीतजास्त मायलेज मिळण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल?    
– पंकज सोनार
* सर्वप्रथम कार चालवताना स्टिअरिंगपासून सीटचे अंतर स्वत:ला कम्फर्टेबली अ‍ॅडजस्ट करावे, जेणेकरून एक्सलरेटर, क्लच, ब्रेक यांच्यावर योग्य वेळी योग्य दाब देता येईल. मायलेज चांगले होण्यासाठी योग्य वेळी गीअर चेंज करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे फर्स्ट गीअर टाकला आणि कारने एक विशिष्ट वेग घेतला की दुसरा गीअर वेळीच टाकावा. नाहीतर इंजिनची शक्ती पर्यायाने इंधन वाया जाते. कारचा स्पीड शक्यतो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. अतिप्रमाणात गीअर शििफ्टग तसेच क्लच दबलेला असताना कार एक्सलरेट करणे या गोष्टी टाळाव्या. कारचा सगळ्यात चांगला मायलेज हा चाळीस ते साठ किमी प्रतितास या वेगात मिळू शकतो. ही गोष्ट कारसोबतच कमीअधिक प्रमाणात बदलते; आणि सर्वात महत्त्वाचे, गीअर टाकताना क्लच दाबलेल्या स्थितीतच असायला हवा. क्लच न दाबता कधीही गिअर टाकू नये. ही काळजी घेतली तर कार चांगला मायलेज देईल.
पहिल्या गीअरवरून दुसरा गीअर टाकताना गाडी मध्येच बंद पडते.
– श्रीनिवास कोणगे, कोल्हापूर
*  गाडीच्या गीअर शाफ्टमध्ये पाणी घुसले असेल किंवा मग बाष्प पकडले असेल. पावसाळ्यात असे होते. त्यामुळे एकदोनदा सव्‍‌र्हिसिंग करून आल्यावर ही अडचण दूर होईल. पावसाळा संपल्यावर गाडीची सव्‍‌र्हिसिंग करून घेणे केव्हाही चांगले.
या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2014 1:02 am

Web Title: car problem and solution
टॅग : Car
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 बॉर्न टू रूल :मर्सिडिझ ई ३५० सीडीआय
3 मी बाइकवेडा.. स्वप्नातली बुलेट
Just Now!
X