News Flash

माझी वंडर व्हॅन ओम्नी

मी एक शेतकरी कुटुंबातला आहे. बालपण आणि प्राथमिक शिक्षण खेडेगावातच झाले.

माझी वंडर व्हॅन ओम्नी
गाडी शिकवायला ते मला एखाद्या खुल्या मदानात घेऊन जातील असे वाटले होते.

मी एक शेतकरी कुटुंबातला आहे. बालपण आणि प्राथमिक शिक्षण खेडेगावातच झाले. आता नोकरीनिमित्त शहरी भागात राहतो. नातलग सगेसोयरे मंडळीसुद्धा ग्रामीण भागात विखुरलेली. अजूनही या भागात धड रस्ते नाहीत. नोकरीनिमित्त २५०-३०० कि.मी. दूर राहावे लागत असल्यामुळे एसटीचा कंटाळवाणा प्रवास करावा लागे. म्हणून स्वतची गाडी असावी असे ठरविले. याचदरम्यान माझी पोस्टातली आरडी मॅच्युअर झाली. एकरकमी ८०,००० मिळणार होते. आम्ही मारुतीची ‘ओम्नी’ घ्यायचा निर्णय पक्का केला. मला ड्रायिव्हग येत नव्हते. गाडी आणायला माझे मित्र संजयभाऊ व किसनभाऊ होते. त्या दोघानां ड्रायव्हिंग चांगलेच जमायचे. संजयभाऊंनी मला आठवडाभरात गाडी चालवायला शिकविले.

गाडी शिकवायला ते मला एखाद्या खुल्या मदानात घेऊन जातील असे वाटले होते. त्यांनी रस्त्यावरच थेट स्टीअरिंग हातात दिले. गीअरचा १,२,३,४ चा पॅटर्न समजावून सांगितला. गाडी थांबल्यास्थितीतच उलटसुलट गीअर पॅटर्न करून पाहिला. मजा वाटली. चालवायचा आदेश मिळाला. १०-२० फूट गाडी नागमोडी चालली. नंतर घाबरत घाबरत सरळ रेषेत हळुहळू चालविली. दरम्यान एक-दोन वाहने समोरून मागून व्यवस्थित ओलांडून गेली. डाव्या-उजव्या व गाडीतल्या आरश्यात कसे पाहायचे हे पण शिकविले. आठवडाभरात गाडी चांगली यायला लागली. तरी पण गीअर चेंज करताना गाडी थोडी हेलकावे घ्यायची. महिनाभराच्या प्रयत्नाने ड्रायव्हिंग चांगलेच जमू लागले होते. आता चिखलदऱ्याची नागमोडी वळणे लीलया पार करू लागलो.
१०-१२ वर्षांपूर्वी आमच्या साहेबांनी सांगितलेल्या गोष्टीचे गांभीर्य मला आता कळले. एकदा त्यांची जीप रात्रीच्यावेळी ट्राफिक जाममध्ये तीन तास अडकली होती. गाडी बंद पडू नये म्हणून अॅक्सिलरेटरवरून आणि गाडी मागे जाऊ नये म्हणून ब्रेकवरून पाय काढता येत नव्हते. हे दोन्ही काम एकाच पायाने एकाचवेळी करतात हे आता समजले. काय वेळ आली असेल त्या रात्री त्यांच्यावर ..गाडी आल्यापासून माझ्या गावाकडच्या चकरा वाढल्या होत्या. एक तर गाडी चालविण्याचा आनंद आणि दुसरे म्हणजे मिरविण्याचा आनंद. माझ्या भाचीच्या लग्नात जेव्हा मी ‘ओम्नी’तून पाच गॅस सिलेण्डर, एक एयर कुलर, एक िक्वटल आंबे, भाजीपाल्यासह तीन माणसे बसवून आणली होती. त्या दिवशी माझे आणि गाडीचे केवढे प्रचंड कौतुक झाले. सर्वाच्या आवडीची झाली होती ही ‘एट सिटर ओम्नी’. गावाकडच्या लोकांना विशेषत महिलांना व बच्चू कंपनीला ‘ओम्नीत’ बसायला फार आवडे. कारण आमने सामने बसून चर्चा, गप्पा करता यायची. भाची जपानला गेली तरी ‘ओम्नीची’ आठवण काढते. तिला आम्ही ‘स्काइपवरून’ हिचे दर्शन घडवितो.
मेव्हणा लंडनला गेला तरी पोरं मामाला ‘ फेसबुक’वरून हिचे दर्शन घडवितात. मुसळधार पाऊस कोसळताना उंच वळणावर गाडीचे दार सताड उघडे ठेवून पाऊस न्याहाळतानाची मजा काही औरच असते. जंगल सफारीसुद्धा यातून करणे मला अजूनही आवडते. आम्ही आजूबाजूचा ३०० ते ४०० किमीचा परिसर अक्षरश िपजून काढला .आता पोरं मोठी झाली आहेत. नव-नवीन मॉडेल बाजारात आल्या आहेत. पण आम्हाला हीच ‘एट सिटर ओम्नी’ आवडते. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर ‘ कॅम्पर व्हॅन’ ही सीरियल आल्यापासून आम्ही हिला ‘वंडर व्हॅन’ नाव ठेवले आहे. आजघडीला गाडी घेऊन नऊ वर्षे झालीत, पण कुठे बंद पडली नाही. आजपर्यंत नो डेंट-नो पेंट, बिचारी पंक्चर झाली ती पण घरीच. सौ.ला पण गाडी शिकायची आहे. ती नक्कीच शिकेल यात शंका नाही.
-वेंकट रेड्डी, यवतमाळ

ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. मेल करा.  ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2015 3:07 am

Web Title: loksatta reader driving experience
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 वाहन चालवण्याचे विधिग्रा नियम
3 नव्या वर्षांत मर्सिडीज महाग
Just Now!
X