dr04* आम्ही घरात पाच जण आहोत. आम्हाला इंधनस्नेही (फ्युएल एफिशिएन्ट) आणि कमी मेन्टेनन्स असणारी कार हवी आहे. आमचा कारचा वापर मर्यादित स्वरूपाचा असेल. होंडा अमेझ आणि मारुती अर्टगिा यांच्यापकी कोणता पर्याय चांगला ठरेल.
    -योगिता पाटील.
 dr05*दोन्ही गाडय़ा इंधनस्नेही आहेत. त्यातल्या त्यात होंडा अमेझ जास्त इंधनस्नेही आहे. परंतु तुम्हाला थोडक्या कालावधीसाठी गाडी वापरून ती विकायची असेल तर मारुतीच्या गाडय़ांचा विचार करा. डिझायर आणि स्विफ्ट या दोन्ही गाडय़ा अर्टगिापेक्षाही चांगल्या आहेत, शिवाय पाच लोकांसाठी कम्फर्टेबलही आहेत. अमेझची रिसेल किंमत मारुतीच्या गाडय़ांपेक्षा थोडी कमीच आहे.
*मला चार ते पाच लाखांपर्यंतची कार घ्यायची आहे. मला व माझ्या कुटुंबीयांना साजेशी कोणती गाडी घ्यावी. मी स्टेट बँकेत कामाला आहे. दुसरे असे की, मला सेकंड हँड गाडी घ्यायची असेल तर काय काळजी घ्यावी लागेल. वॅगन आरबद्दलही तुमची मते सांगा.
    – प्रशांत सूर्यवंशी
dr06*वॅगन आर ही सर्वात उत्तम कार तर आहेच, शिवाय सर्वाधिक खपाची गाडीही आहे. पण तुम्हाला जर चार ते पाच लाखांत सेकंड हँड गाडीच घ्यायची असेल तर मी तुम्हाला नक्कीच २००९ च्या मारुती एसएक्स फोरचे नाव सुचवेल. त्याव्यतिरिक्त होंडा सिटी, किंवा २०१२-१३ मधली स्विफ्ट, होंडा जॅझ, आय २० या गाडय़ाही तुमच्यासाठी चांगल्या ठरू शकतील. जुनी गाडी घेताना तिची मालकी आधी कितीजणांकडे होती, आरसी बुक व्यवस्थित आहे की नाही, इन्शुरन्स वेळोवेळी काढला आहे का या सगळ्याची व्यवस्थित माहिती करून घ्या. गाडी चालवताना इंजिनाचा आवाज येतो का, ब्रेक, सस्पेन्शन याचीही नीट तपासणी करून घ्या. तसेच डॅटसनची गो ही गाडीही तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. ती स्वस्त आणि मस्त आहे.
*मला पेट्रोल व्हर्जनमधील सेडान गाडी घ्यायची आहे. मारुती डिझायर आणि शेवरोले सेल यापकी कोणती निवडावी यात संभ्रम आहे. कृपया मार्गदर्शन करा.
    – सौरभ संभूस, संगमनेर
dr07*सौरभजी, पेट्रोल व्हर्जनमधील सेडान प्रकारच्या गाडय़ांमध्ये सेल आणि डिझायर या दोघींच्या किमती सारख्याच आहेत. मात्र, सेल ही खरी सेडान आहे. कारण तिची लांबी चार हजार २८० मिमी आहे आणि डिझायरची चार हजार मिमी. सेलमध्ये मागील सीट जास्त आरामदायी आहे आणि तिचा लेगस्पेसही चांगला आहे. बूट स्पेसमध्येही सेलच सरस आहे. दोन्ही गाडय़ांचे इंजिन १२०० सीसीचे आहे. परंतु डिझायरचे मायलेज सेलपेक्षा किंचित जास्त आहे. बूट स्पेस जास्त नको असेल तर डिझायर घ्या नाही तर सेल उत्तमच पर्याय आहे. फोर्ड क्लासिकचाही विचार करावा. ही गाडीही सेडान प्रकारातील उत्तम गाडी असून तिचे इंजिन १६०० सीसीचे आहे.
समीर ओक