24 April 2018

News Flash

घरचा निंदक!…

भाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे.

उद्धव ठाकरे यांनी, 'बुक्क्याचा मार'ही सुरू केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी असलेला पैसा कुणाच्या खिशात जातो असा खरमरीत सवाल करीत त्यांनी भाजपला थेट संशयाच्या भोवऱ्यात नेऊन ठेवले.

‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सांगून ठेवल्यामुळे मराठी माणसाने तरी हे वचन ‘परंपरा’ म्हणून पाळलेले दिसत असेल तर त्यात वावगे काहीच नाही. कारण परंपरांचा पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करण्याचा निश्चयच आपण केलेला असतो. राज्यात सत्तेवर असलेला भाजप हा तर संस्कृति आणि परंपरांचा पूजक पक्षच असल्याने याला तो अपवाद नाही हे ओघानेच येते. खरे म्हणजे, भाजपने तुकारामांच्याही पुढे पाऊल टाकून निंदकाला थेट घरातच घेतले आहे. आता, ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशी भाजपची अवस्था झाली असली तरी परंपरेचा त्याग करणे भाजपला शक्यच नाही. कारण परिस्थितीच तशी आहे. शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेचा संसार थाटायचे भाजपने ठरवले, तेव्हा, ‘भांड्याला भांडं लागणारच आणि आवाज येणारच’ हे ‘स्वयंपाकघरातलं सत्य’ भाजपनं स्वीकारलंच होतं. आता तसेच होऊ लागले अाहे. सरकारमध्ये असलो तरी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यावर प्रसंगी विरोधही करणार असे ठणकावूनच उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष सत्तेत बसविला होता. सत्तेची ऊब मिळू लागली की कालांतराने हा तोरा उतरेल अशी त्या वेळी कदाचित भाजपची सेनेबाबत भावना असावी. म्हणूनच, शिवसेनेच्या लहानसहान कुरबुरींना पानं पुसून सत्तेचा गाडा आपल्या गतीने हाकण्याचे तंत्र भाजपने अवलंबिले होते. कामे होत नाहीत, निर्णय घेतले जात नाहीत, डावलले जाते, अशा तक्रारींचा सूर लावूनही भाजप ‘ताकास तूर’ लागू देत नाही हे लक्षात येईपर्यंत तुरीचा मुद्दा आयता हातात आला आणि घरच्या निंदकाची रोखठोक भूमिका शिवसेनेने शिरावर घेतली. मुळात डाळीच्या मुद्द्यावर भाजप, सरकार आणि बापट पुरते भरकटल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाच्या पातळीवर प्रवक्त्याने एक बोलावे तर मंत्री म्हणून बापट भलतेच बोलून जातात आणि वेगळाच काहीतरी निर्णय घेऊन मुख्यमंत्री नवा बोळा फिरवतात असा डाळीचा पोरखेळ रंगलेला असताना मंत्रिमंडळाच्या भर बैठकीत ‘घरचा निंदक’ असलेल्या सेनेच्या मंत्र्यांनी डाळीवरून बापटांना घेरल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. एकीकडे मंत्रिमंडळात सहकारी पक्ष ‘तोंड दाबायच्या’ तयारीत असताना, त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी, ‘बुक्क्याचा मार’ही सुरू केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी असलेला पैसा कुणाच्या खिशात जातो असा खरमरीत सवाल करीत त्यांनी भाजपला थेट संशयाच्या भोवऱ्यात नेऊन ठेवले. डाळीच्या प्रश्नावर डळमळीत चालढकल सुरू असताना दुष्काळनिधीच्या मुद्द्यावर खरमरीत सवाल सुरू करून घरच्या निंदकाची भूमिका बजावण्यास सेनेने सुरुवात केल्याने, ‘शेजारच्या घरा’तील निंदक असलेल्या विरोधी पक्षांचे काम हलके झाले आहे.

First Published on December 2, 2015 3:18 pm

Web Title: bjp shiv sena conflict in maharashtra only for power
 1. P
  PRASANNA
  Dec 3, 2015 at 5:33 am
  ठाकरे आहेत म्हणून मराठी माण थोडातरी मान आहे आज, ह्याची थोडी जाणीव असुदे. कि समोर वाढलेले तात पण शिवसेनेने येउन तोंडात भरवायचे......
  Reply
  1. N
   narendra
   Dec 3, 2015 at 10:08 am
   शिवसेना शेतकर्यांना थेट मदत करते हे चांगले आहे परंतु प्रश्न हा आहे कि राजकीय पक्षाकडे एवढे पैसे आले कुठून आणि कसे कि ते असे पैसे शेतकर्यांना वाटू शकतात असा प्रश्न सर्व सामान्य माण पडतो कारण सरकार देखील पैसे वाटप करण्यासाठी इतक्या जाजी तयार होऊ शकत नाही.शिवसेना इतर पक्षांच्या तुलनेने लहान पक्ष आहे अशी कल्पना होती पण आर्थिकदृष्ट्या चांगलीच संपन्न आहे असे दिसते कारण कोन्ग्रेस(दोन्ही ) इतकी जुनी असतांना आणि इतकी वर्षे सतत सत्तेवर असतांना त्यांनी देखील असे पैसे वाटप कधी केल्याचे माहित नाही
   Reply
   1. S
    suraj
    Dec 3, 2015 at 7:45 am
    हे सरकार माध्यमाच्या बळावरच निवडून आले आहे त्यामुळे उगाच काही बरळू नको
    Reply
    1. S
     Swapnil
     Dec 3, 2015 at 3:57 am
     १. या मध्ये, राजकारणाचे अनेक रंग आहेत. भाजपाला सेनेला छोटा भाऊ ठरवण्याची घाई आहे, शत प्रतिशत भाजपा घोषणा आहे, युती मध्ये शिवसेनेची अडवणूक करणेही आहे. त्याचबरोबर, राष्ट्रावादी आणि सेनेला झुलत ठेवून सरकारची उद्दिष्टे पूर्ण करणे हि आहे. हि सर्व तारेवरची कसरत करत फडणवीस साहेब राज्य चालवत आहेत, तथाकथित विकाी होत आहे. सेना आणि राष्ट्रवादी स्वतःची भाकरी कशी जळणार नाही याची काळजी घेत आहेत. कॉंग्रेस परत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आम्ही सामान्य हताश होऊन हा तमाशा पाहत आहोत.
     Reply
     1. S
      Swapnil
      Dec 3, 2015 at 4:03 am
      २. अच्छे दिन आज नाहीतर उद्या येतील यावर अशा ठेवून आहोत, महागडी दाल विकत घेत आहो, कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहो, टोलच्या लाईनीत उभे राहून सरकारच्या नावाने खडे फोडत आहो. येणारे सन (इवेन्ट्स) साजरे करत आहोत, संसदेतला . विधान सभेतला गोंधळ बघत आहो, तेच उमेदवार (पार्टी बदलून) निवडून देत आहो. हे असेच होते आणि असेच राहणार, युती असो व आघाडी आमच्या रोजनिशीत काही फरक नाही पडणार. चांगल्या उदेच्या आशेवर आमचा आजचा दिवस असाच संपणार.
      Reply
      1. V
       Vinod Kale
       Dec 3, 2015 at 6:58 am
       तुकाराम महाराज म्हणतात "नाथाल्याच्या माथी मारू काठी ".....पण हे तर आमच्या घरात येउन आम्हास मारा असे म्हणायला पण विचार करणार नाहीत .....
       Reply
       1. Load More Comments