News Flash

‘मी शहीद करकरेंचा अपमान केलेला नाही’; साध्वी प्रज्ञासिंह यांचे निवडणूक आयोगाला उत्तर

साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरेंविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिले आहे. आपण कोणत्याही शहीदाचा अपमान केला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी या उत्तरात दिले आहे. साध्वी मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी असून सध्या जामीनावर बाहेर आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. याप्रकरणी निवडणूक आयोगाने साध्वींना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.

साध्वी प्रज्ञा यांनी उत्तरात म्हटले की, मी आपल्या भाषणात कोणत्याही शहीदाच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह विधान केलेले नाही. माझ्या भाषणाची केवळ एकच ओळ न पाहता संपूर्ण भाषण पाहिले पाहिजे. यामध्ये मी तत्कालीन काँग्रेस सरकारकडून मला देण्यात आलेल्या यातनांबाबत उल्लेख केला होता.

माझ्यासोबत त्यावेळी जे झालं ते जनतेसमोर ठेवणं हा माझा अधिकार आहे. माझ्या वक्तव्याला माध्यमांनी मोडून-तोडून सादर केलं आहे. मात्र, जनभावनेचा सन्मान करताना मी माझे विधान मागे घेतले होते. मी असे कुठलेही कृत्य केलेले नाही किंवा भाषणही दिलेले नाही, ज्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होईल.

दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुंबई हल्ल्यावेळचे मुंबई एटीएसचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, त्यावेळी मुंबईच्या तुरुंगात सुरक्षा आयोगाच्या सदस्यांनी करकरे यांना सांगितले होते की, जर साध्वीविरोधात पुरावे नाहीत तर त्यांना सोडून द्या. मात्र, करकरेंनी आपण कुठूनही पुरावे घेऊन येऊ मात्र साध्वीला सोडणार नाही, असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 10:23 pm

Web Title: i didnt make any defamatory comments for any martyr answer sadhvi pradnya singh to ec for notice
Next Stories
1 श्रीलंकेतील साखळी स्फोटांमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
2 आम्ही दिवाळीसाठी अण्वस्त्रं ठेवलेली नाहीत; मोदींचा पाकला इशारा
3 मला घाबरुन शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली : प्रकाश आंबेडकर
Just Now!
X