माझी लढाई उदयनराजेंशी आहे, त्यांचा पराभव मी करणारच अशी गर्जना महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली आहे. मी दिवसभर मिशीचा पीळ रहातो पण कॉलर टाईट रहात नाही असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या कॉलर टाईट करण्याच्या कृतीचीही खिल्ली उडवली. शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली आहे, पण तुमच्या व्यासपीठावर भाजपाचे लोक दिसतात असे विचारताच पाटील म्हटले, शिवसेना आणि भाजपा यांच्यातले मनोमीलन घट्ट आहे. जिल्ह्यातले शिवसैनिक नाराजत नाहीत असंही पाटील यांनी स्पष्ट केले.

एवढंच नाही तर मी माझा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करणार आहे असंही त्यांनी सांगितले. साताऱ्यात दोघा भावांनी कितीही पदयात्रा काढल्या तरी फरक पडणार नाही. मराठा समाजाचे राज्यात मोर्चे निघाले, किती मोर्चात ते सहभागी झाले होते. सातारा मतदारसंघातील जनतेला बदल हवा आहे. तो 23 तारखेला चमत्कार झालेल्या दिसेल. निकालानंतर पाच वर्षात विकास काय असतो ते मी दाखवून देणार आहे. मी करतो नंतर बोलतो, करून दाखवल्यावर मी त्यांनीं उपस्थितीत केलेल्या प्रश्नांची उत्तरे देईन, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचा एकही खासदार निवडून येणार नाही: माधव भंडारी

केवळ सातारा जिल्ह्यात नव्हे तर राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वेळेपेक्षा यावेळी युतीचे खासदार वाढणार आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ६ खासदार निवडून आले होते. यावेळी एकही खासदार येणार नाही असा दावा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, भरत पाटील, हणमंत चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.