लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. हे मतदान बहुतांशी सुरळीत पार पडले असून प्राथमिक अंदाजानुसार ५९ मतदारसंघांत ६०.२१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये ७३.०५ टक्के झाले आहे. उत्तर प्रदेश(५४.३७%), पंजाब(५८.८१%), पश्चिम बंगाल, बिहार(४९.९२%), मध्य प्रदेश(६९.३८%), हिमाचल प्रदेश(६६.१८%), झारखंड (७०.०५%) या राज्यांसह चंडीगड(६३.५७%) येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडले. अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यातील मतदानासोबतच पणजी आणि तमिळनाडूतील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वीच्या सहा टप्प्यांमध्ये सरासरी ६६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.

 

क्रिकेटपटू हरभजन सिंह सकाळीच  मतदानासाठी रांगेत उभा
#LokSabhaElections2019 : Bihar Deputy CM Sushil Modi casts his vote at booth number 49 in Patna. pic.twitter.com/Blwg9EThAX

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले मतदान

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे बजावला मतदानाचा हक्क

रविवारी मतदान होत असलेल्या टप्प्यातील पक्षनिहाय संख्याबळ

    • बिहार- ८ : भाजप ५, जनता दल (सं) १, राष्ट्रीय लोक समता पक्ष २
    • चंडीगड -१ : भाजप १
    • हिमाचल प्रदेश -४ : भाजप ४
    • झारखंड- ३: झारखंड मुक्ती मोर्चा २, भाजप १
    • मध्य प्रदेश – ८ : भाजप ७, काँग्रेस
    • पंजाब- १३ : शिरोमणी अकाली दल ४, काँग्रेस ४, आप ४ , भाजप १
    • उत्तर प्रदेश – १३: भाजप ११, सप १, अपना दल १
    • पश्चिम बंगाल -९ : तृणमूल काँग्रेस