धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते असे उद्धव धारावीतील भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांच्या डासभाऊच्या शोधासाठी त्यांना काँग्रेसने शिवसेनेवर टीका केली आहे.

मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रवाला आम्ही मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. पण मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी एवढ्या मोठ्या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढेल या हेतूने पाहिले जात होते, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेला लगावला आहे.

‘डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे याकरता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी करत काँग्रेसने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दक्षिण मध्य मुंबईचे भाजपा- शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर घणाघाती टीका केली होती.