मावळ लोकसभा मतदार संघात मावळ्यांच सरकार हवंय की मावळला गोळीबार करणाऱ्यांच असा सवाल उपस्थित कार्यकर्त्याना शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करत अजित पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. ते विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते. यावेळी शिवसेनवचे संजय राऊत,आमदार लक्ष्मण जगताप,खासदार श्रीरंग बारणे,आमदार गौतम चाबुकस्वार व कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांना घरी बसवायचं आहे,सध्या मावळ लोकसभा मतदार संघात काही हजार लोक आले आहेत.परंतु, बारामतीची भानामती इथं चालणार नसल्याचे ते म्हणाले. गेल्या लोकसभेत,विधान सभेत आणि महानगर पालिकेच्या निवडणुकीत पराभव केलेला आहे.आताच्या लोकसभेत देखील तेच होणार.मावळचा गोळीबार कोणी केला? कोणाचं सरकार होतं, पाहिजे का ते सरकार अस ठाकरे कार्यकर्त्याना म्हणाले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मावळ्यांच सरकार पाहिजे की मावळला गोळीबार करणाऱ्यांचं पाहिजे असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्याना केला.

शिरूर लोकसभा मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे निवडणूक लढवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. ती भूमिका मालिकेपुरती आहे. असे म्हणत शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांचा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.