महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अनेक प्रचारसभा घेतल्या. या प्रचार सभांना प्रचंड गर्दीही झाली. मात्र विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये झाले नाही. राज यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची चांगलीच चर्चा झाली होती. तरी याचा परिणाम मतदानावर झालेल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान दिसत नाही. राज यांनी सभा घेतलेल्या सर्व १० मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजपा युतीचेच उमेदावर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रचार करणारे राज ठाकरे सध्या सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होताना दिसत आहेत. पाहुयात असेच व्हायरल झालेले ट्विट…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते सकाळी उठेपर्यंत

तुझा राज ठाकरे होईल

अशीही आघाडी

राज यांनी काढला आदेश

हे होणारच होतं

निकाल दाखवताना

लाव रे तो न्यूज चॅनेल

ते झोपेतून उठले का?

महाराष्ट्रात राज ठाकरेंची लाट

राज यांची मुलाखत घ्या ना

निरुपयोगी

राज यांनी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान १२ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान राज्यभरामध्ये एकूण १० सभा घेतल्या. यामध्ये नांदेड (१२ एप्रिल), सोलापूर (१५ एप्रिल), कोल्हापूर (१६ एप्रिल), सातारा (१७ एप्रिल), पुणे (१८ एप्रिल), महाड (रायगड) (१९ एप्रिल), काळाचौकी (मुंबई) (२३ एप्रिल), भांडुप (पश्चिम, मुंबई) (२४ एप्रिल), कामोठे (पनवेल) (२५ एप्रिल) आणि नाशिक (२६ एप्रिल) या दहा ठिकाणी सभा घेतल्या होत्या. यासभांद्वारे त्यांनी मोदी-शाह जोडगोळीवर जोरदार हल्ला चढवला होता. राज यांच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या चार तासांमध्ये हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या सर्वच जागांवर शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदावरांना आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. राज यांनी सभा घेतलेल्या बहुतेक सर्वच जागांवर महाआघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

 

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp supporters troll raj thackeray after massive success in lok sabha election
First published on: 23-05-2019 at 14:23 IST