गोव्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेच्या वाटेवर आहे, कारण मतमोजीणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून भाजपा सर्वात मोठा पक्ष दिसत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले असून, भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आजच राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रमोद सावंत यांनी विजयी झाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.

माझ्या मतदार संघामध्ये मी नसतानाही काम झालं, त्यासाठी माझ्या जिंकण्याचं संपूर्ण श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पक्षाला जात आहे. भलेही कमी फरकाने असो मात्र विजयी झालो आहे. डबल इंजिनचं सरकार परत येणार. आम्ही मगोप आणि अपक्ष विजयी उमेदवारांना देखील सोबत घेणार आहोत.” असं प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमोद सावंत यांचा ५०० मतांनी विजय झाला आहे. गोव्यात भाजपाला सर्वाधिक मतं मिळाली असून त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, मगोप, आप, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष यांचा क्रमांक लागतो. अजूनही मतमोजणी सुरु आहे. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे. पणजी मतदारसंघातून भाजपाचे बाबुश मोन्सरात विजयी झाले आहेत.