scorecardresearch

Premium

Chhattisgarh Election Result 2023 : भाजपाला स्पष्ट बहुमत, सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा

Chhattisgarh Legislative Assembly Election Result 2023 Updates : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल एका क्लिकवर

Chhattisgarh Election Result 2023 Updates in Marathi
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल २०२३

Chhattisgarh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023: छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे समस्त देशाचे लक्ष लागले आहे. या राज्यात काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होईल की भाजपा पुन्हा एकदा मुसंडी मारेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. छत्तीसगडमधील ९० जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. ७ नोव्हेंबर रोजी येथे पहिल्या टप्यातील मतदान पार झालं; तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबर रोजी पार पडलं. छत्तीसगडमधील ९० जागांवर लढणाऱ्या हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. यावर आज (३ डिसेंबर) मतमोजणी होणार असून जनतेनं कोणत्या उमेदवाराला कौल दिला? हे पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहेत. या निवडणूक निकालासह याबाबतच्या प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स…

kolhapur lok sabha election marathi news, kolhapur vidhan sabha elections marathi news
कोल्हापुरात लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीची तयारी जोमात
police commissioner vinay kumar choubey marathi news, pimpri chinchwad lok sabha election marathi news
पिंपरी : लोकसभा निवडणुकीची तयारी; पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांची पाहणी
hemant soren jharkhand assembly floor test
Video: “मी रडणार नाही, हे अश्रू…”, हेमंत सोरेन यांचं अटकेच्या कारवाईनंतर विधानसभेत पहिलं भाषण; म्हणाले, “यात राज्यपालांचाही हात…!”
state backward class commission submit maratha survey report lok sabha code of conduct government
लोकसभा आचारसंहितेपूर्वी मराठा सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे
Live Updates

Chhattisgarh Assembly Election Result 2023 Updates: छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकालाबाबतच्या महत्त्वाच्या घडामोडी

21:38 (IST) 3 Dec 2023
छत्तीसगडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत

भाजपाचा ४६ हून अधिक जागांवर विजय होत स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे भाजपाचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1731342834945704102

19:25 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये १८ जागांवर भाजपाचा विजय, ३६ जागांवर आघाडी

अधिकृत आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये भाजपाने १८ जागांवर विजय संपादन केला आहे. तर ३६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने १० जागांवर विजय संपादन केलं असून २६ जागांवर आघाडी घेतली आहे. ६२ जागांवर अद्याप मतमोजणी सुरू आहे…

19:20 (IST) 3 Dec 2023
छत्तीसगडमध्ये १.२९ टक्के मतदारांनी नोटाला (NOTA) मतदान केलं

छत्तीसगडमध्ये एकूण ७६.३ टक्के मतदान झालं. यातील १.२९ टक्के मतदारांनी NOTA बटण दाबलं.

17:41 (IST) 3 Dec 2023
तीन राज्यांत भाजपाचा विजय निश्चित; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

भाजपाच्या अनेक मोठे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपाच्या यशाबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. पोस्टमधून त्यांनी राज्यातील जनतेचे आणि भाजपा नेत्यांचे आभार मानले आहेत.

सविस्तर वाचा

16:54 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: भाजपाची ५६ जागांवर आघाडी; काँग्रेसची स्थिती काय?

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाने बहुमताचा आकडा पार केला असून ५६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला केवळ ३२ जागांवर आघाडी घेता आली. याव्यतिरिक्त बीएसपीने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून भाजपाने छत्तीसगडमध्ये विजय जवळपास निश्चित केला आहे.

14:59 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये बघेल यांच्या मंत्रिमंडळातील १३ पैकी ९ मंत्री पिछाडीवर

छत्तीसगडमधील भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमधील १३ पैकी नऊ मंत्री पिछाडीवर आहेत. या नेत्यांनी मतमोजणीच्या सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर हे नऊ मंत्री पिछाडीवर पडले आहेत. अद्याप येथील मतमोजणी सुरू असून निकाल जाहीर व्हायचा आहे.

नऊ मंत्र्यांमध्ये उपमुख्यमंत्री टीएस सिंह देव, गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांचा समावेश आहे. हे दोघेही छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. जे २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या जबरदस्त विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. राज्य युनिटचे प्रमुख दीपक बैज हेही पिछाडीवर आहेत.

13:40 (IST) 3 Dec 2023
माजी सीआरपीएफ जवान रामकुमार टोप्पोंचा काँग्रेसच्या मंत्र्याला धोबीपछाड

माजी सीआरपीएफ जवान रामकुमार टोप्पो हे सीतापूर मतदारसंघातून मंत्री अमरजीत भगत यांच्या विरोधात ३२६२ मतांनी आघाडीवर आहेत. १८ पैकी चार फेऱ्यांची मतमोजणी संपली आहे. सीतापूर ही जागा २००३ पासून काँग्रेसने कधीही गमावलेली नाही.

13:33 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: पाटणमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल ४२६२ मतांनी आघाडीवर

छत्तीसगडचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल पाटण मतदारसंघात ४२६२ मतांनी आघाडीवर आहेत.

13:04 (IST) 3 Dec 2023
भाजपाचे प्रभारी अन् सहप्रभारी दिल्लीहून रायपूरला रवाना होणार

छत्तीसगड भाजपा निवडणूक प्रभारी ओम माथर आणि सहप्रभारी मंत्री मनसुख मांडविया दुपारी दिल्लीहून रायपूरला रवाना होणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1731214445815447951

12:36 (IST) 3 Dec 2023
उपमुख्यमंत्री टीएस सिंगदेव अंबिकापूर मतदारसंघातून पिछाडीवर

उपमुख्यमंत्री, काँग्रेस नेते टीएस सिंगदेव है चौथ्या फेरीनंतर अंबिकापूर मतदारसंघातून १६२३ मतांनी पिछाडीवर आहेत. सिंगदेव यांना १८,२४० मते मिळाली आहेत.

https://twitter.com/ANI/status/1731207559955333128

12:27 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये फासे पालटले, काँग्रेसला धोबीपछाड देत भाजपा विजयाच्या दिशेनं

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती. त्यामुळे तिथे काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यानंतर छत्तीसगडमध्ये फासे पालटल्याचं चित्र आहे. सध्याच्या घडीला भाजपाने ५४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ३४ जागांवर पुढे आहे. या व्यतिरिक्त इतर पक्षाचा एक उमेदवार आघाडीवर आहे.

12:11 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमधील संभाव्य विजयावर भाजपा नेते रमण सिंह यांची प्रतिक्रिया

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यामध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र होतं. पण आता मतांचा कल काही प्रमाणात भाजपाच्या बाजूने झुकताना दिसत आहे. यावर आता छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते रमण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा सविस्तर

11:46 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये अटीतटीचा सामना, काँग्रेस-भाजपामधील चुरस वाढली

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. दर मिनिटाला निकालाचा कौल एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे झुकताना दिसत आहे. सध्याच्या घडीला काँग्रेस ४७ जागांवर आघाडीवर आहे. तर ४२ जागांवर भाजपा पुढे आहे. ९० पैकी एका जागेवर अपक्ष आमदार आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

10:03 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: काँग्रेसची ५७ जागांवर आघाडी

छत्तीसगडमध्ये काँग्रेसने ५७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा ३३ जागांवर पुढे आहे. अनेक मतदारसंघात चुरसीची लढत पाहायला मिळत आहे. पण छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्ता राखण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

09:06 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ४८ जागांवर आघाडी

सुरुवातीच्या कलनुसार, छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून भाजपाला धोबीपछाड दिल्याचं दिसत आहे. आताच्या घडीला काँग्रेस ४८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा ३२ जागांवर आघाडी घेतली आहे.

08:27 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: “आम्ही ७५ हून अधिक जागा जिंकू”, काँग्रेस नेते ताम्रध्वज साहूंचा दावा

“आम्ही ७५ हून अधिक जागा जिंकू आणि राज्यात सरकार बनवू”- छत्तीसगडचे मंत्री आणि काँग्रेस नेते ताम्रध्वज साहू

https://twitter.com/ANI/status/1731135666757697772

08:23 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: निवडणूक निकालाचा सुरुवातीचा कल

छत्तीसगडमध्ये ८ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर भाजपा ६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इथे अटीतटीची चुरस पाहायला मिळत आहे.

08:20 (IST) 3 Dec 2023
भाजपाच्या ‘या’ नेत्यांकडे सर्वांचं लक्ष

-रमण सिंग (तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भाजपाचे प्रमुख नेते)

-विजय बघेल, विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नातेवाईक

-भाजपाचा विजय झाल्यास अरुण साओ हे संभाव्य मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार मानले जात आहेत.

-केदार कश्यप (भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत बळीराम कश्यप यांचे पुत्र. ते बस्तरमधून चार वेळा आमदार आणि चार वेळा लोकसभा खासदार होते.)

– चार वेळा मंत्री राहिलेले बृजमोहन अग्रवाल

– केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह

08:12 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: काँग्रेसचे पाच प्रमुख चेहरे

भूपेश बघेल, मुख्यमंत्री

टी एस सिंग देव, उपमुख्यमंत्री

चरणदास महंत, विधानसभा अध्यक्ष

ताम्रध्वज साहू, गृहमंत्री

दीपक बैज, खासदार आणि सीपीसीसी प्रमुख

07:51 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: मतमोजणीपूर्वी ‘स्ट्राँग रूम’चं कुलूप उघडलं

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी मतमोजणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरगुजा येथील स्ट्राँग रूमचे कुलूप उघडलं आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1731134313251672078

07:30 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: “आम्ही राज्यात ४२ ते ५५ जागा जिंकू”, रमण सिंह यांचा दावा

“छत्तीसगडमध्ये भाजपा स्पष्ट बहुमताने सरकार बनवेल. आम्ही राज्यात ४२ ते ५५ जागा जिंकू”- भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह

https://twitter.com/ANI/status/1731125625233326500

07:04 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: अंबिकापूर येथील मतमोजणी केंद्रावरील सुरक्षेत वाढ

थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार असल्याने अंबिकापूर येथील मतमोजणी केंद्रावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1731115778488053950

06:58 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: भूपेश बघेल हे एक प्रबळ उमेदवार पण…

छत्तीसगडचे विद्यमान मुख्यमंंत्री भूपेश बघेल हे दुर्ग जिल्ह्यातील पाटण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. बघेल हे एक प्रबळ उमेदवार आहेत. मात्र, या जागेसाठी भाजपाने बघेल यांचे नातेवाईक विजय बघेल यांना उमेदवारी दिलेली आहे. विजय बघेल हे सध्या दुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र तथा जनता काँग्रेस छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष अमित जोगी हेदेखील पाटण या मतदारसंघातूनच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

06:56 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: रायपूरमधील मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची तयारी सुरू

रायपूर येथील मतमोजणी केंद्रावर मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे. येथे लवकरच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणी केंद्रावर सुरक्षा दलांच्या जवानांना तैनात केलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1731121048807178528

06:52 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: “छत्तीसगडमध्ये काँग्रेस हरणार”, भाजपा प्रदेशाध्यांचा दावा

काँग्रेस पक्ष हा घाबरलेला आणि बिथरलेला पक्ष आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस हरणार आहे, त्यामुळे ते कधी EVM ला दोष देते तर कधी संविधानाला दोष देते. काँग्रेस पक्ष निवडणुकीत हरणार आहे. छत्तीसगडच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. – छत्तीसगड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साओ

https://twitter.com/ANI/status/1731119596449792433

06:46 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023:

छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप), जनता काँग्रेस छत्तीसगड आणि बहुजन समाज पार्टी (बीएसपी) अशा पक्षांनीदेखील उडी घेतलेली आहे. त्यामुळे याचे निवडणूक निकालावर काय परिणाम होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

06:39 (IST) 3 Dec 2023
Chhattisgarh Election Result 2023: छत्तीसगडच्या एग्झिट पोलचे अंदाज काय होते?

विविध संस्थानी छत्तीसगडच्या एग्झिट पोलचा दिलेला अंदाज

https://twitter.com/LoksattaLive/status/1730242516396441865

छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा एकत्रित आढावा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: Chhattisgarh assembly election result 2023 live updates in marathi vote counting congress bjp latest news rmm

First published on: 03-12-2023 at 06:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×