काँग्रेसचे खासदार माणिकम टागोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि एका छोट्या मुलीचा व्हिडीओ भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर टागोर यांनी आक्षेप घेतला आहे. या व्हिडीओमधील मुलगी पंतप्रधान मोदींच्या बाजूला उभी राहून भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ एक कविता म्हणताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी भाजपावर टीका करताना लहान मुलींकडून निवडणुकीचा प्रचार करुन देत असल्याचा आरोप केला आहे.

भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “गुजराती लोकांच्या मनामध्ये विकासच आहे. भाजपाच आफल्याला वाचवू शकते भाजपाच पुन्हा सत्तेत येईल,” अशा अर्थाची कविता ही मुलगी सादर करताना या व्हिडीओत दिसत आहे. “एनसीपीआरसीने (राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग) राहुल गांधींबरोबर चालणाऱ्या मुलांची दखल घेतली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलीबरोबर निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. याची दखल एनसीपीआरसी घेणार का?” असा प्रश्न कन्हैया कुमार यांनी विचारला आहे.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Pankaja Munde Pritam Munde
आता प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा; पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!
rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रदान मोदी सध्या भारतीय जनता पार्टीसाठी प्रचार करत आहेत. सोमवारी पंतप्रधान मोदींनी सुरेंद्रनगर, भरुच आणि नवसारीमध्ये मोठ्या सभा घेतल्या. काँग्रेसचे तामिळनाडूमधील वृधूंगनगर मतदारसंघाचे खासदार माणिकम टागोर यांनी थेट एनसीपीआरसीला या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून अशापद्धतीने मुलांचा वापर करुन खालच्या स्तराला जाऊन प्रचार केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदाराने केला आहे. “निवडणूक प्रचारासाठी मुलांचा वापर करणे योग्य आहे का?” असा प्रश्न टागोर यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. “आता एनसीपीसीआर नरेंद्र बाबांना नोटीस पाठवणार का? अशाप्रकारे मोदींसंदर्भातील गोष्टींमध्ये दुजाभाव का केला जातो?” असे प्रश्नही टागोर यांनी विचारलेत.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या सभेआधी या मुलीला स्वत: भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्यांनी तिच्याकडून ही कविता म्हणून घेतली. मोदींनी या मुलीबरोबर हसत हसत गप्पा मारल्या. या मुलीने कविता सादर करुन झाल्यानंतर मोदींना टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं.