लोकसभा निवडणुकीचं मतदान आजपासून सुरू होत आहे. आज पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये तीन मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष भाजपाचे एजंट आहेत, त्यामुळे या मतदारसंघात इंडिया आघाडीकडून कोणताही पाठिंबा मिळत नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. मुर्शीदाबाद येथील जाहीर सभेत बोलत असताना बॅनर्जी म्हणाल्या की, मतदानापूर्व चाचण्यामध्ये भाजपाला अधिक जागा मिळतील असे सांगण्यात आले असले तरी भाजपा २०० च्या पुढे जाणार नाही.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “काही लोक बोलतात आम्ही इंडिया आघाडी आहोत म्हणून आम्हाला मतदान द्या. मात्र या आघाडीत इंडिया नाही, ती आघाडी फक्त दिल्लीत आहे. काँग्रेस आणि सीपीआय (एम) यांची इंडिया आघाडी पश्चिम बंगालमध्ये नाही. इथे आमच्यासाठी ते भाजपा आहेत. त्यांना एक मत जाणं म्हणजे भाजपाला दोन मत जाणे. त्यामुळे त्यांना मत देऊ नका.” बॅनर्जी पुढे म्हणाल्या, आगामी काळात आम्ही विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व नक्कीच करू. पण पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हे भाजपाचे एजंट आहेत. त्यामुळे त्यांना मी इथे पाठिंबा देणार नाही.

‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका

तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि काँग्रेस हे पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सीपीआय (एम) ने तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांशी सुरू असलेली बोलणी फिस्कटल्यानंतर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

बॅनर्जी यांनी यावेळी इंडिया आघाडीबरोबर भाजपा आणि निवडणूक आयोगावरही टीका केली. भाजपा २०० जागांच्याही पुढे जाणार नाही. आता जे मतदानपूर्व चाचण्यांचे कल येत आहेत, ते सर्व खोटे आहेत. सर्व्हे करून घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. त्यामुळे या सर्व्हेकडे लक्ष देऊ नका. भाजपा मुळीच जिंकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

भरसभेत मोहम्मद शमीचे नाव घेत नरेंद्र मोदींनी दिले दाखले, नेमकं काय घडलं, ज्याची सर्वत्र होतेय चर्चा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम बंगालमध्ये सर्व सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. १९ एप्रिल ते १ जून पर्यंत पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू राहणार आहे.