भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी चौकार लगावला आहे. उत्तर प्रदेशात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या भाजपच्या ‘बुलडोझर’ने विरोधकांना भुईसपाट केलेच; पण, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील सत्ताही राखत पक्षाने आपलीच लाट कायम असल्याचे सिद्ध केले. पंजाबने काँग्रेसचा ‘झाडू’न धुव्वा उडवला. ‘आप’ने दिल्लीपाठोपाठ तिथेही एकहाती सत्ता मिळवून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने घोडदौड केली. पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांच्या पक्षांतराने जेरीस आलेल्या काँग्रेसच्या अस्तित्वावर या निकालाने प्रश्नचिन्ह उभे केले. या निकालानंतर पक्षाचे नेते आणि खासदार शशी थरुर यांनी आता बदल टाळला जाऊ शकत नाही असं स्पष्टच म्हटलं आहे.

VIDEO: पाच राज्यातील निकालांचा नेमका अर्थ काय?; गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण

congress bjp manifesto climate change
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
PM narendra Modi about changing Constitution India Bloc Rahul Gandhi loksabha election 2024
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

पाचही राज्यांमध्ये काँग्रेसची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. एकाही राज्यात काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही. पंजाबमध्ये तर काँग्रेसने हातातील सत्ता गमावली. या निकालावर शशी थरुर यांनी प्रतिक्रिया देताना जर काँग्रेसला आपलं नशीब बदलण्याची इच्छा असेल तर आता ते बदल टाळू शकत नाही असं स्पष्टच सांगितलं आहे. शशी थरुर यांनी काँग्रेसच्या अन्य नेत्यांप्रमाणे परिवर्तनाचं समर्थन केलं आहे.

शशी थरुर म्हणाले आहेत की, “काँग्रेसवर विश्वास असणाऱ्या सर्वांना विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहून दु:ख झालं आहे. काँग्रेसने मांडलेल्या भारताच्या कल्पनेला आणि देशासमार मांडलेला सकारात्मक अजेंडा यांना मजबूत करण्याची हीच वेळ आहे”.

पुढे ते म्हणालेत की, “संघटनात्मक नेतृत्वात अशाप्रकारे सुधारणा करण्याची गरज आहे जेणेकरुन विचारांना पुन्हा प्रज्वलित करता येईल आणि लोकांना प्रेरणा मिळेल. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे ती म्हणजे जर यश हवं असेल तर बदल टाळला जाऊ शकत नाही”.

हा २०२४ चा कौल – मोदी

उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील भाजपचा ऐतिहासिक विजय म्हणजे २०२४मधील आगामी लोकसभा निवडणुकीतील निकालाची चुणूक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातील विजयातून पुढे जातो, असे मानले जाते. त्याचा संदर्भ देत, मोदींनी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप यशाची पुनरावृती करेल असा दावा केला.

‘’उत्तर प्रदेशातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित केला होता असे काही विश्लेषकांचे म्हणणे होते. उत्तर प्रदेशतील २०२२ च्या निकालाने २०२४मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले असे हे विश्लेषक आता सांगू लागतील. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २०२२ च्या उत्तर प्रदेशातील निकालातून स्पष्ट दिसतो’’, असे मोदी म्हणाले. २०१४ व २०१९ मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता, २०२४ची निवडणूक जिंकल्यास भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करू शकेल.