कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १३५ हून अधिक जागा मिळवत काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसने भाजपाला पराभवाची धूळ चारली. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली होती. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या अशी दोन्ही नावं चर्चेत होती. त्यापैकी सिद्धरामय्यांचं नाव फायनल झालं. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक विधानसभा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली आहे. तसंच या ठिकाणी पूजाही केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे व्हिडीओत?

कर्नाटक विधानसभेत काँग्रेस कार्यकर्ते गेले होते. त्यांनी तिथे गोमूत्र शिंपडलं आणि पूजाही केली. आम्ही विधानसभा शुद्ध केली असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. याआधी कर्नाटक विधानसभेवर भाजपाची सत्ता होती. बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर आता काँग्रेसची सत्ता आली आहे.

या व्हिडीओत हे पाहायला मिळतं आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका बादलीत गोमूत्र आणलं आहे. हे गोमूत्र विशिष्ट पद्धतीने शिंपडलं जातं आहे.विधानसभेच्या चारही दिशांना हे गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि पूजा करण्यात आली. ANI ने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चांगलाच चर्चेत आला आहे. या काँग्रेस कार्यकर्त्यांना जेव्हा तुम्ही काय करत आहात हे विचारण्यात आलं तेव्हा आम्ही विधासभेचं शुद्धीकरण करतो आहोत असं त्यांनी सांगितलं. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आज पहिलं अधिवेशन सुरु होतं आहे. हे विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे हे विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष असतील. विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर सिद्धरामय्या हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत. सिद्धरामय्यांनी दुसऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress workers sprinkle cow urine and perform pooja at the state assembly in bengaluru scj
First published on: 22-05-2023 at 13:33 IST