दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा महायुतीने केली आहे. यामिनी जाधव या दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांना टक्कर देणार आहेत. अरविंद सावंत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ठाकरे गटाने त्यांना तिकिट दिलं आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने या ठिकाणी यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामिनी जाधव अरविंद सावंतांना देणार टक्कर

यामिनी जाधव यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली होती. त्यानंतर यामिनी जाधव यांचं नाव जाहीर झालं आहे. यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईत काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी नगरसेविका म्हणून उत्तम काम केलं आहे. तसंच त्यांनी विविध पदंही भुषवली आहेत. सध्याच्या घडीला त्या आमदार आहेत. दक्षिण मुंबईत त्यांचं काम चांगलं असल्याने यामिनी जाधव यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेसाठी मंगलप्रभात लोढा इच्छुक होते. मात्र एकनाथ शिंदे यांना ही जागा स्वतःकडे ठेवण्यात यश आलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून तिकिट देण्याचा निर्णय आधीच झाला आहे. ही जागा आम्ही लढवावी असं मनात होतं. मात्र तीन जागा भाजपा आणि तीन जागा शिवसेना लढवणार असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे हा निर्णय झाला आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यामिनी जाधव उमेदवारी जाहीर झाल्यावर काय म्हणाल्या?

“मला उमेदवारी जाहीर झाल्याचा अतिशय आनंद झाला आहे. मला जी संधी दिली आणि जो विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला त्यानंतर सगळेच जण उत्तम तयारी करतील. महायुतीने जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी आभार मानते. अरविंद सावंत यांचा विचार मी करण्यापेक्षा महायुतीची कामं काय? मोदींची कामं काय ? हे सगळं मी सांगणार आहे. या लढतीकडे मी आव्हानात्मक लढत म्हणून पाहते निवडणुकीतली प्रत्येक लढत आव्हानात्मकच असते.” असं यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde shivsena gave tickit to yamini jadhav for loksabha election scj
First published on: 30-04-2024 at 17:23 IST