Eknath Shinde : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाले आहेत. मात्र महाराष्ट्राला अद्याप मुख्यमंत्री मिळालेला नाही. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार ही बाब निश्चित आहे. कारण महायुतीला २३९ जागांचं बहुमत मिळालं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते अशा चर्चा रंगल्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं जावं अशीही मागणी केली होती. मात्र दिल्लीत होणाऱ्या महायुतीच्या बैठकीच्या एक दिवस आधी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाण्यातल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी हे सांगितलं की मुख्यमंत्री निवडीचे सगळे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडे असतील. एकनाथ शिंदे त्यात अडसर ठरणार नाही.

महाराष्ट्राला अद्याप मुख्यमंत्री मिळालेला नाही

दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. अजूनही महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला नाही. भाजपाच्या नेत्यांची बैठक मुंबईत होईल. त्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसंच मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे त्यामुळे सगळ्यांची काळजी घेतो आहे असं एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) शिवसेनेतील नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य समोर आलं आहे. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली नाही म्हणून भाजपाची साथ सोडायला आम्ही काही उद्धव ठाकरे नाही असं या नेत्याने म्हटलं आहे.

नरेश म्हस्के यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

महायुतीच्या नेत्यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह महायुतीचे इतर सहकारी होते. या बैठकीनंतर माध्यमांमध्ये विविध बातम्या पाहतो आहे. १२ मंत्रिपदं मागितली, १३ पदं मागितली, गृहमंत्री पद हवंय असा आग्रह धरला अशा बातम्या चालत आहेत. मात्र मला जी माहिती मिळाली त्यानुसार महाराष्ट्र समृद्ध कसा करायचा? त्यावर चर्चा झाली. तसंच तुम्ही कायम आमच्या पाठिशी उभे राहा हे अमित शाह यांना महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं. अमित शाह यांनीही महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी आहोत हे सांगितलं.

Maharashtra Assembly Election Results 2024 MLA Income
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील उपस्थित होते.

आम्ही काय उद्धव ठाकरे नाही-नरेश म्हस्केंचा टोला

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनीही आधीच जाहीर केलं आहे की आम्हाला मुख्यमंत्रिच्या खुर्चीचा आग्रह नाही. महायुतीचा जो निर्णय होईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. आम्ही सगळे एक आहोत, आमचा एकोपा कायम आहे. आम्ही उद्धव ठाकरे नाही की जे खुर्चीसाठी भाजपाची साथ सोडतील असं सांगत नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात महायुतीतलं पक्षीय बलाबल कसं आहे?

महाराष्ट्रात महायुतीला एकूण २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी १३२ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपा १३२ आमदारांसह राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत. तर त्यांच्या शिवसेनेचे ४ पुरस्कृत आमदार विजयी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे ६१ आमदारांचं बळ आहे. तर अजित पवार यांच्याकडे ४१ आमदारांचं बळ आहे कारण त्यांनी तेवढे आमदार निवडून आणले आहेत. असं असलं तरीही मुख्यमंत्री कोण होणार? हा सस्पेन्स कायम आहे.