गोव्यातील निवडून आलेल्या आमदारांनी जनादेशाचा अशाप्रकारे अपमान केला आहे, की जो देशातील अन्य कोणत्याही राज्यात झाला नाही. निवडणूक यंत्रणा आणि राजकारण्यांवर नजर ठेवणाऱ्या एडीआरच्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत सुमारे २४ आमदारांनी पक्ष बदलले आहेत, ज्यांची संख्या ही ४० सदस्यीय विधानसभेच्या ६० टक्के आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एडीआरच्या अहवालात म्हटले आहे की, सध्याच्या विधानसभेच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ४० पैकी २४ आमदारांनी पक्ष बदलला आहे. भारतात असे कुठेही घडले नाही. हे जनतेने दिलेल्या स्पष्ट जनादेशाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. नेत्यांनी राजकारणातील नैतिकता आणि शिस्तीचेही उल्लंघन केले आहे.

एडीआरने आपल्या अहवालात २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाचा राजीनामा दिलेल्या आणि भाजपाच्या तिकिटावर लढलेल्या नेत्यांची नावे समाविष्ट केलेली नाहीत. तर, या नेत्यांमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार विश्वजित राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांचा समावेश आहे. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. नंतर दोघेही पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.

२०१७ मध्ये काँग्रेसने सुमारे १७ जागा जिंकल्या होत्या. पण आज देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रसचे विधानसभेत फक्त दोन सदस्य आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आणि सुमारे १० आमदार भाजपामध्ये सहभागी झाले. त्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, जेनिफर मॉन्सेरेट, फ्रान्सिस्को सिल्व्हेरिया, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, विल्फ्रेड नाझरेथ मेनिनो, क्लॅफसिओ डायस, अँटोनियो कॅरानो फर्नांडिस, नीळकंठ हालरंकर, इसिडोर फर्नांडिस, अटानासिओ मोन्सेरात यांचा समावेश होता.

त्यानंतर काँग्रेसचे आमदार रवी नायक यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते आणि आमदार लुइझिन्हो फालेरो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. तसेच, काँग्रेसचे आमदार अॅलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोव्यात पक्षांतराचे वारे वेगात ; भाजपला दुहेरी धक्का : एका मंत्र्यासह आमदाराची सोडचिठ्ठी

याशिवाय गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार जयेश साळगावकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) आमदार दीपक पौसकर आणि मनोहर आजगावकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. याशिवाय अपक्ष आमदार रोहन खुंटे आणि गोविंद गावडे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. आणखी एक अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

गोव्यात मंत्र्याचा भाजपप्रवेश

तसेच, भाजपच्या काही आमदारांनीही पक्ष सोडला. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामध्ये गेलेले प्रवीण झांटे, काँग्रेसमधील मायकेल लोबो, जोस लुईस कार्लोस आल्मेडा यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपा आमदार अलिना सलदान्हा यांनी देखील आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. सध्या विधानसभेत काँग्रेसचे केवळ दोन तर भाजपाचे २७ आमदार आहेत.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa election 60 percent mlas change party in five years msr
First published on: 23-01-2022 at 13:26 IST