कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव करण्यासाठी भाजपाने व्ही सोमण्णा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. त्यांनी मैसुरू येथील वरुणा मतदारसंघातून सिद्धरामय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवली. यासह त्यांना चामराजनगर येथूनही तिकीट देण्यात आले होते. मात्र या दोन्ही जागांवर ७२ वर्षीय सोमण्णा यांचा पराभव झाला आहे. वरुणा आणि चामराजनगर या दोन्ही मतदारसंघात लिंगायत समाजाच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. सोमण्णा हेदेखील लिंगायत समाजातूनच येतात. असे असूनदेखील या दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी त्यांना नाकारले आहे.

वरुणा मतदारसंघातून सोमण्णा यांचा पराभव

सोमण्णा हे गोविंदराजनगर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सूक होते. मात्र त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे भाजपाने त्यांना वरुणा या मतदारसंघातून सिद्धरायमय्या यांच्याविरोधात लढण्याचे आदेश दिले. वरुणा या मतदारसंघात साधारण ४० टक्के मतदार हे लिंगायत समाजाचे आहेत. मात्र तिरीदेखील भाजपाला येथे या समाजाची अपेक्षित मतं मिळाली नाहीत. यावर प्रतिक्रिया देताना सोमण्णा यांनी येडियुरप्पा यांना लक्ष्य केले. “वरुणा मतदारसंघात लिंगायत समाजाच्या मतांचे विभाजन का झाले, हा प्रश्न तुम्ही बीएस येडियुरप्पा यांना विचारायला हवा होता. ते भाजापचे सर्वोच्च नेते आहेत. मला या मुद्द्यावर अडून बसायचे नाही. मी या निवडणुकीत विजयी होऊ शकलो नाही, याचे मला दु:ख आहे. मात्र मी हा पराभव मान्य केलेला आहे. माझा पराभव झाला असला तरी मी राजकारण सोडणार नाही. मी माझी वेळ येण्याची वाट पाहीन,” असे सोमण्णा म्हणाले.

Lok Sabha Yavatmal Washim,
यवतमाळ वाशीममध्ये चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार ?
eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
abhijeet bichukale and udayanraje bhosale
साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात; उमेदवारी अर्जाबाबत म्हणाले, “मी एकटा…”
Three candidates named Anant Geete have apply for Lok Sabha election from Raigad Constituency
रायगडमध्ये नामसाधर्म्य उमेदवारांची पंरपरा यंदाही कायम, तीन ‘अनंत गीते’ निवडणुकीच्या रिंगणात

हेही वाचा >> देशातल्या इतक्या राज्यांमध्ये आहे काँग्रेसची एकहाती सत्ता, जाणून घ्या एका क्लिकवर!

सोमण्णा यांनी वरुणा आणि चामराजनगर अशा दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत सोमण्णा यांनी गोविंदराजनगर येथून निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित होता. मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी वरुणा आणि चामराजनगर या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली. वरुणा मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच सोमण्णा पिछाडीवर होते. येथे सिद्धरामय्या यांना १ लाख १९ हजार ८१६ मते पडली. ही मते एकूण मतांच्या ६० टक्के आहेत. तर सोमण्णा यांना ७३ हजार ६५३ मते मिळाली. सोमण्णा यांना एकूण मतांपैकी ३६.९४ टक्के मते मिळाली.

हेही वाचा >> Karnataka Election : बंगळुरूत मध्यरात्री हाय वोल्टेज ड्रामा, ‘या’ कारणामुळे काँग्रेसने जिंकलेली जागा गमावली, नेमकं काय घडलं वाचा!

गोमण्णा यांच्या पराभवासाठी सिद्धरामय्या आणि येडियुरप्पा यांच्यात डील?

भाजपाने सोमण्णा यांना वरुणा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी भाजपा सोमण्णा यांचे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र निवडणुकीत पराभव झाला असला तरी सोमण्णा यांनी मी राजकारणात कायम राहणार आहे, असे सांगितले आहे. मात्र ७२ वर्षीय सोमण्णा यांचे आगामी राजकीय करिअर धुसर दिसत आहे. येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांचा शिकारीपुरा या मतदारसंघातून विजय झाला. ‘विजयेंद्र यांच्या विजयासाठी सोमण्णा यांचा पराभव’ अशी ‘डील’ येडियुरप्पा आणि सिद्धरामय्या यांच्यात झाली होती, असा दावा केला जात आहे. शिकारीपुरा येथून काँग्रेस पक्षाकडून नागराज गौडा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र येथून गोनी मालातेश यांना उमेदवारी देण्यात आली. पुढे गौडा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत गौडा यांना ७० हजार ८०२ मते मिळाली तर विजयेंद्र यांना ८१ हजार ८१० मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार मालातेश यांना अवघी ८ हजार १०१ मते मिळाली.