Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत ४०० जागांचा आकडा पार करण्याचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्ष निकालात भाजपाची गाडी २४४ जागांवर अडकल्याची दिसत आहे. त्यामुळे भाजपा स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे भाजपाला २७२ चा जादुई आकडा गाठण्यासाठी मित्र पक्षाची गरज लागणार आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भाजपाला पाठिंबा दिलेला असून, राज्यात भाजपा आणि टीडीपीची युती आहे. लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात टीडीपीला १६ जागा मिळाल्या आहेत.

एवढेच नाही तर आंध्रामध्ये चंद्राबाबू नायडू आणि भाजपाची असलेली युती जवळपास १५० जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे आंध्र प्रदेशात पुढे चंद्राबाबू यांचे सरकार येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना जबरदस्तीने खुर्चीवर बसवताना दिसत आहेत. चंद्राबाबू आम्हाला सोडून जाऊ नका खुर्चीत बसाच, असा हट्टही मोदींनी धरल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवरुन आता आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या नावाची चर्चा आहे.

पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एकाच मंचावर आले होते. मंचावर सर्वजण पंतप्रधानांचे स्वागत करीत होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री माजी चंद्राबाबू नायडू यांनीही पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यांनी पीएम मोदींना फुलांचा गुच्छ दिला आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांशी हस्तांदोलन केले. पंतप्रधान बराच वेळ माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचा हात धरून उभे राहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री नायडू यांनी भगव्या रंगाची शाल पंतप्रधानांना भेट म्हणून दिली. यानंतर पुन्हा कोणीतरी पंतप्रधानांचे स्वागत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वागतानंतर जेव्हा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू मंचावरून निघू लागले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगाने माजी मुख्यमंत्री नायडूंच्या दिशेने सरसावले. यावेळी प्रत्यक्षात पंतप्रधानांसाठी ठेवलेल्या व्हीआयपी खुर्चीसमोर मुख्यमंत्री उभे होते. त्यानंतर पंतप्रधानांनी नायडू यांचे दोन्ही हात धरून त्यांना स्वतःकडे ओढले आणि जबरदस्तीने व्हीआयपी खुर्चीवर बसवले. मुख्यमंत्री स्वत:ला मागे खेचत राहिले, कदाचित त्यांना पंतप्रधानांसाठी ठेवलेल्या खुर्चीवर बसायचे नव्हते, पण मोदींनी नायडूंना जबरदस्तीने त्यांच्या खुर्चीवर बसवले आणि स्वत: त्यांच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या खुर्चीवर बसले. हा व्हिडीओ २०१७ सालातील आहे. जो आताची राजकीय परिस्थितीत पाहता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.