पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात एक शब्द लोकप्रिय केला आहे. ‘मोदी की गॅरंटी’ हा शब्द कसा समोर आला. हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामागचं कारण सांगितलं आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात भाषणात मोदी हा शब्द अनेकदा वापरतात. तो शब्द कसा आला? त्यामागची कहाणी काय हे पंंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

२०१४ मध्ये निवडणूक आम्ही लढवत होतो तेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. पण लोकांच्या मनात आशा होती की मोदी काहीतरी करुन दाखवतील. २०१९ मध्ये मी प्रचार सुरु केला तेव्हा मी पाहिलं की लोकांना जी आशा वाटत होती त्याचं रुपांतर विश्वासात झालं होतं. २०१४ ते २०१९ च्या कार्यकाळात जे काम लोकांनी पाहिलं त्यामुळे लोकांनी विश्वास टाकला. आता २०२४ ची निवडणूक गॅरंटी झाली आहे. १० वर्षे मी पंतप्रधान म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आता मी गॅरंटी देऊ शकतो.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य “पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंची फोनवरुन चौकशी करायचे, कारण..”

मोदी की गॅरंटी शब्द कसा आला?

२०१४ पासून देशसेवेसाठी मी स्वतःला वाहून घेतलं. २०१९ मध्ये मी रिपोर्ट कार्ड घेऊन लोकांकडे गेलो. सामान्य माणसाला विश्वास निर्माण झाला की पाच वर्षांत मोदी इतकं करु शकतात. आता लोकांना गॅरंटी निर्माण झाली आहे, त्यातूनच मोदी की गॅरंटी हा शब्द आला. लोकांनाच ही खात्री आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच २०१४ मध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझ्या विरोधात लोक होते ते सत्ताधारी होते त्यांच्याकडे सगळी साधनं होती. मी २०१४ च्या आधी मुख्यमंत्री होतो तरीही मला टार्गेट करत होते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीव्ही ९ ला मुलाखत दिली त्या मुलाखतीत त्यांनी मोदी की गॅरंटी या वाक्यामागचं कारण सांगितलं.

हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला दिली ‘ही’ तीन आव्हानं; म्हणाले, “संविधानासाठी जगणं आणि मरणं…”

गॅरंटी शब्दावर माझा कॉपी राईट नाही त्यामुळे लोकही तो वापरतात

गॅरंटी शब्दावर माझा कॉपीराईट नाही. त्यामुळे मी तो शब्द वापरतो तसाच तो शब्द माझे विरोधकही वापरु शकतात. ज्यांना नकली माल विकायचा असतो तेव्हा ते लोकही गॅरंटी शब्द वापरतात. पण गॅरंटी हा शब्द हा असाच येत नाही. गॅरंटी शब्द मी वापरला नाही तरीही लोकांना माझ्याबद्दल खात्री आहे. मी आता जे बोलतो त्यावर विश्वास ठेवतात. कारण त्यामागे केलेल्या कामाची साधना आहे. गुजरातच्या लोकांचंच उदाहरण देतो. मी एखादा शब्द किंवा वाक्य बोललो की त्यांना खात्री वाटते. त्यामुळे माझा प्रत्येक शब्द मी जपून आणि सजगपणे वापरतो. गॅरंटी शब्दाचा काही लोक चुकीचा वापर करत आहेत. आता त्याला मी काहीच करु शकत नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच राहुल गांधींना टोला लगावला आहे. खटाखट, टकाटक, चकाचक हे शब्द वापरुन गॅरंटी देत आहेत त्यांच्यावर कुणी का विश्वास ठेवेल? असंही प्रश्न राहुल गांधींना उद्देशून विचारला आहे. मी हवेत गॅरंटी दिलेली नाही.