लोकसभेची निवडणूक १९ तारखेपासून सात टप्प्यात होणार आहे. यासाठी प्रचार एकदम जोरदार सुरु आहे. भाजपा, एनडीएने ४०० पारचा नारा दिला आहे. तसंच मोदींनी भाजपा ३७० जागा जिंकेल असाही दावा केला आहे. लोकसभा निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केली आहे. देशभरात मिळून ४०० पारचं लक्ष्य भाजपाला गाठायचं आहे त्यानुसार प्रचार सुरु आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यात आणि इंडिया आघाडीने देशात भाजपा विरोधात कंबर कसली आहे. आम्ही ३०० पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या सगळ्या वातावरणात एका मशिदीत अब की बार ४०० पार, हर हर मोदी, घर घर मोदी, मोदी है ते मुमकिन है या घोषणा देण्यात आल्या.

कुठे देण्यात आल्या या घोषणा?

अलीगंज हैदरी मशिदीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘मोदी है तो मुमकिन है’ या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. बोहरा समाजाने मशिदीच्या आत पीएम मोदी यांचे पोस्टर दाखवले. भोपाळमधून भाजपा उमेदवार आलोक शर्मा यांच्या समर्थनार्थ बोहरा समाजाने पीएम मोदी यांच्यासाठी घोषणाबाजी केली. बोहरा समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन ‘अबकी बार ४०० पार’ची घोषणा सुद्धा दिली. आमिल जौहर अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरुन कौतुक केलं. पंतप्रधान मोदी आणि भाजपाला यश मिळावं म्हणून प्रार्थनाही केली.

Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा
pm Narendra modi Maharashtra
PM Narendra Modi: मोदींच्या सभांचा ८ नोव्हेंबरपासून धडाका

हे पण वाचा- “भाजपा म्हणजे भला मोठ्ठा डायनासोर, शेपटीला लागलेलं मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ लागतो”; महिला मोर्चाच्या माजी उपाध्यक्षांची टीका

भाजपाला बहुतांश लोक मुस्लिम विरोधी मानतात. पण पीएम मोदी ४०० पारचं टार्गेट गाठण्यासाठी मुस्लिम समुदायाला सुद्धा आपल्याबरोबर जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यात बोहरा समुदाय आणि पसमांदा मुस्लिमांचा विश्वास संपादन करण्याची भाजपाची रणनीती आहे. टीव्ही ९ भारतवर्षने हे वृत्त दिलं आहे.

कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी पहिले पंतप्रधान

दाऊदी बोहरा हा मुस्लिमांमधील आर्थिकदृष्टया सर्वात श्रीमंत समाज आहे. भाजपासाठी नेहमीच या समाजाची भूमिका अनुकूल राहिली आहे. पीएम नरेंद्र मोदी आणि बोहरा समाजामध्ये चांगलं नातं आहे असा संदेश देण्यात आला आहे. बोहरा समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणारे मोदी पहिले पंतप्रधान होते. या समुदायातील बहुतांश लोक व्यापारी आहेत. यांचा व्यावसायिक समाज पीएम मोदींना पाठिंबा देणारा समाज आहे.