लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून देशभरात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सत्ताधारी आपल्या कामाची उजळणी करत आहेत. हे सर्व करत असताना सर्व राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागते. मते मिळविण्यासाठी नियम मोडता येत नाहीत. देशाचा पंतप्रधानालाही हे नियम लागू आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द ठरविण्यात आली होती, हा इतिहास आहे. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशाच प्रकारचा एक आरोप झाला असून थेट दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

पुढची निवडणूक ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले…

पिलीभीत मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देव आणि धार्मिक स्थळाच्या नावावर मत मागितल्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असून, असे केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कारवाई व्हावी, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. आनंद एस. जोंधळे यांनी सदर याचिका दाखल केली आहे. यासाठी त्यांनी ९ एप्रिल रोजी पंतप्रधानांनी पिलीभीत याठिकाणी दिलेल्या भाषणाचा हवाला दिला आहे.

‘देशात राम मंदिर झाले पण आग लागली नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणाले? वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोंधळे यांनी आपल्या याचिकेत दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू धार्मिक स्थळाच्या नावावर तसेच शीख देवता आणि शिखांच्या धार्मिक स्थळाच्या नावावर मते मागण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतीही निवडणूक लढण्यापासून सहा वर्षांची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.