लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असले, तरी अमेठी आणि रायबरेलीच्या जागेचा सन्पेन्स अद्यापही कायम आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अशात आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही जागांसाठी उमेवादारांच्या नावाची घोषणा होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे याप्रकरणात आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अमेठीतून राहुल गांधींऐवजी प्रियंका गांधी वाड्रा निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर राहुल गांधी हे रायबरेलीतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. असे झाले तर अमेठीत प्रियंका गांधी यांची थेट लढत भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याशी होणार आहे.

Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
sharad pawar approaches supreme court over clock symbol print politics
घडयाळ चिन्हाबाबत १५ ऑक्टोबरला सुनावणी; चिन्हाचा वापर करण्यास मनाई करण्याची न्यायालयाला विनंती
Bank of Baroda Recruitment 2024 Bank of Baroda is conducting the recruitment process for Supervisor posts
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या
CRPF Constable Recruitment 2024 CRPF is conducting the recruitment process for 11541 posts
सीआरपीएफमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही तगडा, जाणून घ्या पात्रता
tmc to install tire killers on roads in thane
विरुद्ध दिशेकडील वाहतुक रोखण्यासाठी ठाण्यात ‘टायर किलर’
Cyber scam mumbai women nude pictures
Cyber scam: सायबर चोरट्यांनी हद्दच केली, मुंबईतील वकील महिलेला चौकशीच्या नावाखाली विवस्त्र होण्यास भाग पाडलं
Protest In Shimla Against Alleged Illegal Construction Of Mosque
हिमाचल प्रदेशात मशिदीतील अवैध बांधकामांबाबत निदर्शने ; आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य चर्चेत, “उद्धव ठाकरे हे माझे शत्रू नाहीत, उद्या…”

अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. या जागांवर पारंपारिकपणे गांधी कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवतात. मात्र, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रायबरेलीची जागा खाली झाली आहे. तर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधीचा पराभव केल्यानंतर ही जागाही काँग्रेसला गमवावी लागली आहे.

अमेठी आणि रायबरेलीमध्ये २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी पूर्ण केली असून जर रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली, तर राहुल गांधी यांचा अर्ज भरताना सोनिया गांधी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजपाने अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जाागांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तर रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये रायबरेलीतून सोनिया गांधी यांनी दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव केला होता.