Raj Thackeray Shivadi Assembly constituency Bala Nandgaonkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचा पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन करत आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना महाराष्ट्र सैनिकांनी अधिक आक्रमक होत आंदोलन केलं होतं. मात्र, त्यावेळी सरकारने हजारो महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. यावरून राज ठाकरे यांनी अनेकदा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी व्यक्त केली होती. आज (१८ नोव्हेंबर) पुन्हा एकदा राज यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. राज यांनी शिवडी येथील मनसेचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार बाळा नांदगावकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत राज ठाकरे म्हणाले, “आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून काही लोकांनी जातीपातीचं राजकारण सुरू केलं आहे. आपला समाज पोखरला जातोय. एखाद्या व्यक्तीला तिची जात प्रिय असणं समजू शकतो. परंतु, दुसऱ्या जातीचा द्वेष करणं, लोकांमध्ये द्वेष निर्माण करणं चुकीचं आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपलं राज्य, आपला महाराष्ट्र सुधारला पाहिजे.”

राज ठाकरे म्हणाले, “निवडणुका येतात-जातात, हा पडेल, तो पराभूत होईल, हे सगळं चालूच राहील. परंतु, या सगळ्यामुळे राज्याचं व्याकरण एकदा का बिघडलं की ते परत सुधारता येणार नाही. त्यासाठीच मी प्रयत्न करतोय. महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे काढावे यासाठी मनसेने मोठं आंदोलन केलं. मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करतोय. त्यानंतर मशिदींवरील भोंगे काढण्याचे आदेश दिले गेले. त्यानंतर अनेक मशिदींवरील भोंगे काढण्यात आले. अनेक भोंगे बंद झाले. मात्र, नंतर ते थांबवण्यात आलं. मशिदींवरील भोंगे बंद करतो, पण तुम्ही हनुमान चालीसा म्हणू नका असं सांगण्यात आलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. भोंग्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या माझ्या १७,००० महाराष्ट्र सैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. कारण ते हनुमान चालीसा म्हणणार होते. म्हणजेच त्यांचं सरकार मशिदींवरच्या भोंग्यांना संरक्षण देत होतं आणि हनुमान चालीसा म्हणणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांविरोधात गुन्हे दाखल करत होतं”.

हे ही वाचा >> “जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय”, प्रतिभा पवारांच्या हातातील फलकाने वेधलं बारामतीकराचं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

मनसे अध्यक्ष म्हणाले, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या अनेक सभांमधून, शिवतीर्थावरून सांगायचे की मशिदींवरील भोंगे खाली आलेच पाहिजेत. तेच काम राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांविरोधात गुन्हे दाखल करतोच कसा?