महायुतीने रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघावरून निर्माण झालेला तिढा सोडवला आहे. महायुतीत ही जागा भारतीय जनता पार्टीने मिळवली असून या जागेवर त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना येथून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. युतीत गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा शिवसेना लढवत आली आहे. मात्र यंदा ही जागा भाजपाला सुटली आहे. संयुक्त शिवसेनेचे विनायक राऊत हे मागील दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते. जून २०२२ मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. परंतु, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नव्हता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले खरे, मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळाली आहे. टाकरे गटाने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना या मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध राऊत अशी लढाई होणार आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Amar Kale says our fight is not with Sumit Wankhede or Dadarao Keche fight is with Devendra Fadnavis
वर्धा : ‘माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच’ या खासदारांच्या वक्तव्याने…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
bjp leader jagannath patil
“माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा, दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता आरोप
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा
Indian Context of Federalism Loksatta Lecture Dhananjay Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी सांगलीत जाऊन ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे. कोकणात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात आमच्यासमोर तेच हवे होते. भाजपाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

हे ही वाचा >> Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्र्यांसह माजी राज्यपालांचं भवितव्य पणाला

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात पाय रोवण्याचा भाजपाचा मनसुबा असल्याने या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासून येथे उमेदवारीसाठी शिंदे गटावर दबाव ठेवला होता. त्याचबरोबर पक्षातर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार प्रमोद जठार इत्यादी नावं उमेदवार म्हणून सातत्याने चर्चेत ठेवली होती. त्यापैकी नारायण राणेंच्या नावावर गुरुवारी (१८ एप्रिल) शिक्कामोर्तब झालं. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार असतील असं जाहीर केलं. तसेच या निवडणुकीत आम्ही राणेंचा प्रचार करू असंही सामंत बंधूंनी स्पष्ट केलं.