आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जातेय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आज दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यानुसार, बीड लोकसभा मतदारसंघ आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी या गटाने आज एक्सद्वारे जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. याआधी शरद पवार गटाने पाच जणांची यादी जाहीर केली होती.

हेही वाचा >> बीड लोकसभा लढण्यास इच्छुक; पंकजा मुंडे असो की प्रीतम मुंडे, मी लढणार – बजरंग सोनवणे

बीडमध्ये बजरंग सोनवणेंना संधी

बीड लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. पैकी, ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांची नावे आघाडीवर होते. बजरंग सोनवणे यांनी २०१९ ला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडीतील संघर्ष संपला

भिवंडी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. काँग्रेस या जागेसाठी फार आग्रही होती. त्यामुळे ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर, काँग्रेसने ही जागा सोडली असून भिवंडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. शरद पवारांनी येथून सुरेश म्हात्रेंना उमेदवारी दिली असून भाजपाचे कपिल पाटील यांच्याविरोधात त्यांची लढत होणार आहे.

पहिल्या यादीत शरद पवार गटाकडून कोणाची नावे जाहीर झाली?

  • वर्धा – अमर काळे
  • दिंडोरी – भास्करराव भगरे
  • बारामती – सुप्रिया सुळे
  • शिरूर – अमोल कोल्हे</li>
  • अहमदनगर – निलेश लंके