गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (शुक्रवार) वास्को येथे सभा घेतली. याप्रसंगी त्यांनी शिवसेनेचं धोरण नेमकं काय असणार हे सांगितलं. तसेच, “शिवसेनेचा दररा काय असतो, शिवसेना आली म्हणजे नक्की काय असतं? हे या गोव्याच्या राजकारणाला आता कळायला लागलेलं आहे.” असंही आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरे म्हणाले की, “या राज्याशी आपलं वेगळं नातं आहे. कित्येक जणांचे कुलदैवतं, मंदिरं, गावं, घरं इथे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जसं सांगितलेलं आहे की भूमिपुत्रांना न्याय द्या, तेच काम आपण आज इथे करण्यासाठी आलेलो आहोत. जरी आज आपलं महाराष्ट्रात राज्य असेल, सरकार असेल आपण सगळे प्रचारासाठी तिथून आलेलो असूत, तरी जेव्हा गोवा बद्दल आपण बोलतो तेव्हा आपण प्राधान्य स्थानिक गोवेकरांना देणार आहोत. हा मी तुम्हाला शब्द देण्यासाठी आलेलो आहे. ”

तर, “शिवसेनेचा दररा काय असतो, शिवसेना आली म्हणजे नक्की काय असतं? हे या गोव्याच्या राजकारणाला आता कळायला लागलेलं आहे. मी सगळ्यांना हेच सांगायला आलेलो आहे की, इथे शिवसेना म्हणून लढत असताना, पुढे जात असताना साखळीत तर मी प्रचाराला पुढे आलोय पण जोडसाखळी मी खेळणार नाही. शिवसेना म्हणून एक आपलं धोरण आहे, प्रत्येक राज्य, जिल्हा, शहर, गाव तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यायाचा म्हणजे नेमकं काय करायच? हे शिवसेनेकडून समजून घेतलं पाहिजे.” असंही आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, ”मी एकच सांगू इच्छितो की, ही तर आपली सुरूवात आहे. प्रत्येक निवडणूक तर आपण लढूच, पण मला खात्री आहे की, प्रत्येक निवडणूक लढणार आणि जिंकणार. तुमचा आमच्यावरील विश्वास आणखी घट्ट होत जाणार. आज इथे प्रचारासाठई नाही तर आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा घेण्यासाठी आलोय. आपल्या जे नवीन गोवा निर्माण करायचं आहे ते आपल्या आशीर्वादाने असेल आणि आपल्यासाठी असेल.” असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena leader aditya thackerays campaign rally in goa msr
First published on: 11-02-2022 at 16:20 IST