देशात उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासह उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व जागांसाठी मतदान पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत मतदारांना आवाहन केलंय. अमित शाह यांनी भ्रष्टाचार आणि लांगुलचालनापासून मुक्त सरकारच देवभूमी उत्तराखंडचा विकास, अभिमान आणि सन्मानाला पुढे घेऊन जाऊ शकते, असं म्हणत मतदानाचं आवाहन केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासोबत आज (१४ फेब्रुवारी) उत्तराखंड आणि गोव्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे, की लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभागी व्हा आणि मतदानाचा नवा विक्रम बनवा. लक्षात ठेवा – आधी मतदान, मग दुसरं काम!”

bjp to defeat mamta banerjee in loksabha
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?
BJP Candidate Tenth List for Lok Sabha
मोठी बातमी! भाजपाचे पुन्हा धक्कातंत्र; चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट, ‘या’ नव्या चेहऱ्यांना दिली संधी
Ajit Pawar appeal to the wrestlers of the district regarding the dispute in the wrestling federation pune
अजित पवार यांचा पैलवानांना ‘खुराक’; जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी मदत करण्याचे आवाहन
panvel tdr marathi news, cidco area of ​​panvel municipal corporation marathi news
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत टीडीआर लागू होणार, ३० दिवसांत नागरिकांना हरकतींची मुभा 

अमित शाह म्हणाले, “भ्रष्टाचार आणि लांगुलचालनापासून मुक्त सरकारच देवभूमी उत्तराखंडचा विकास, अभिमान आणि सन्मानाला पुढे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे मी उत्तराखंडच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मतदान करून राज्याच्या विकास आणि प्रगतीत सहभागी व्हावं. आधी मतदान, मग जलपान.”

गोवा, उत्तराखंडमध्ये मतदान; दुसरा टप्पा : उत्तर प्रदेशातही ५५ जागांसाठी निवडणूक

विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज (१४ फेब्रुवारी) गोवा, उत्तराखंडमधील सर्व जागांसह उत्तर प्रदेशातील ५५ जागांसाठी मतदान होणार आह़े या तिन्ही राज्यांत सत्ता राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत. या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती. मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजपा आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आह़े शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही निवडणूकपूर्व आघाडी जाहीर केली, तर आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष), सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपाला १३ जागा मिळाल्या होत्या़ मात्र, भाजपाने सत्तेचे गणित जमवून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता.

हेही वाचा : Electoral Ink पाण्याच्या संपर्कात येताच रंगात बदल, साबण असो की हँडवॉश, ही शाई सहजासहजी निघत का नाही?

उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आहे. राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात आहेत. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ५७ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होते. काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या़ उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान होणार असून, ५८६ उमेदवार रिंगणात आहेत. सहारणपूर, बिजनौर, मोरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बरेली आणि शाहजहानपूर आदी जिल्ह्यांमध्ये हे मतदान होईल. गेल्या निवडणुकीत भाजपने ५५ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या.

६० हजार पोलीस तैनात : उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५००० संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. तिथे ६० हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच निमलष्करी दलाचे शेकडो जवान तैनात आहेत.