13 August 2020

News Flash

समजून घ्या सहजपणे : तुम्हाला करोना फोबियानं ग्रासलं आहे का?

सर्दी खोकला किंवा ताप आल्यास करोना झाल्याची भिती अनेकांना वाटतेय

– रितिका अग्रवाल मेहता

करोना-फोबिया म्हणजे करोना विषाणूची लागण होण्याची सतत भीती वाटत राहण. हा एक मनोविकृती शब्द नाही तर त्याऐवजी कोविड -१९ शी संबंधित जगभरातील वाढती भीती, चिंता आणि घाबरल्याचे चित्रित करण्यासाठी माध्यमांनी तयार केलेला शब्द आहे. कोणत्याही एका व्यक्तीला त्याच्या भीतीचा स्रोत टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सकारात्मक आणि काही गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे.

करोना-फोबियाची संभाव्य कारणे :

बहुतेक लोकांना महाकाय साथीच्या रोगाच्या आजारपणाचा अनुभव आलेला नाही, ज्यात प्रत्येक जण धोक्यामध्ये आलं आहे. याचा १९९ देशांमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. ज्याचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनात झालं आहे; वर्क फ्रॉम होम, सॅनिटायझर वापरणे, मास्क किंवा ग्लोव्हज प्रत्येक वेळी बाहेर जाताना वापरणे, तसेच बऱ्याच देशात प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जरा जरी शिंक किंवा खोकला आल्यास लोक घाबरून जात आहेत. तसेच यावर कोणतीही लस किंवा उपचाराची पद्धत अद्याप अस्तित्वात नाही, त्यामुळे या विषाणूमुळे संसर्गजन्य होण्याची शक्यता असल्याने लोक अधिक संवेदनशील झाले आहेत.

करोनाव्हायरस वर मर्यादित माहिती उपलब्ध असल्याने परिस्थितीवर नियंत्रण गमावल्याची भावना येऊ शकते. सामाजिक पातळीवरील अंतर ठेवणे, अलग राहणे, हात धुणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे हे उपाय इतक्या भयंकर आजाराशी लढण्यास काही प्रमाणात साधे वाटू शकतात, त्यामुळे लोकांना त्याची अधिक चिंता वाटून दुसऱ्या टोकाकडे नेईल.याव्यतिरिक्त, सोशल मीडियाच्या वापरामुळे बर्याच चुकीच्या माहिती आणि अफवा पसरवून त्यामध्ये अधिक भर पडत आहे. यामुळे लोकांना सत्य काय आहे आणि काय नाही हे समजणे कठीण होते. उदाहरणार्थ, दारूचे सेवन केल्याने विषाणू नष्ट करण्यात प्रभावी ठरते ह्या अफवेमुळे इराणमध्ये अल्कोहोल विषबाधामुळे ४४ मृत्यूमुखी पडली. हा गंभीर परिणाम होत असतानाही, दररोज असे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेजेस आढळतात जे विविध उपचार पद्धती, सुप्रसिद्ध डॉक्टरांकडील रेकॉर्डिंग किंवा कोव्हीड -१९ विषयीचे ‘तथ्य’ लिहिलेले आढळतात जे खोटे असल्याचेही आढळले आहे. खोट्या गोष्टी सोडून सत्य सांगण्याची ही असमर्थता मानसिकरित्या थकवणारी आणि चिंताजनक असू शकते.

आपण यावर काय उपाय करू शकतो?

– आपल्या भावनाना समजून घ्या : यावेळी घाबरून किंवा चिंताग्रस्त होणे स्वाभाविक आहे. आपला विश्वास असलेल्या लोकांसह याची चर्चा करा आणि आपल्या चिंतां कमी करा.

– डब्ल्यूएचओ आणि अधिकृत सरकारी स्त्रोतांसारख्या विश्वासार्ह असलेल्या माहितीचे स्त्रोत ओळखा (विश्वासार्ह स्त्रोतांकडून आल्याचा दावा करणारे व्हाट्सएप संदेश नाही!)

– मर्यादित वेन बातम्या पहा, दिवसातून सुमारे दोन वेळा १५-२० मिनिट. Ø नवीन प्रकरणे आणि मृत्यूची संख्या मोजणे थांबवा – ही काही मॅच नाही!

– आपल्या साखर आणि कॅफीनचे सेवन मर्यादित करा, कारण यामुळे आपणास त्रासदायक वाटू शकते. पौष्टिक आहार घ्या, पुरेसे पाणी प्या आणि चांगले झोपा आणि खबरदारी घ्या!

– स्वत:ला वेगळे ठेवा, सामाजिक अंतर, नियमित हात धुणे इत्यादी खबरदारी आपल्या नियमित वेळापत्रकात समाविष्ट करा जेणेकरून चिंताग्रस्त होऊन तुम्ही टोकाचा विचार करणार नाही.

– एक नवीन दिनचर्या तयार करा आणि त्याचेच अनुसरण करण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुम्हाला शांतपणा जाणवू शकेल. कुटूंबासह घरी आणि मित्रांसह वेळ घालवा, वाचन करा (कोविद १९ शी संबंधित नाही, चित्रपट पहा), स्वतःला वेगळे ठेवण्यास वेळ द्या.

– नेहमी स्वतःला आठवण करून द्या की आपण असर्वजण एकत्र आहोत आणि हि वेळ सुद्धा निघून जाईल.

– तरीही तुम्हाला अद्याप याच्याशी सामना करण्यास अडचण येत असल्यास, आपली चिंता दूर करण्यासाठी, मदत करण्यासाठी मानसिक आरोग्य प्रॅक्टिशनर (थेरपिस्ट / सायकोथेरेपिस्ट / सल्लागार) चा सल्ला घ्या. सामाजिक अंतरामुळे, थेरपिस्ट सध्या आपल्या मदतीसाठी ऑनलाइन उपलब्ध आहेत.

(लेखिका सल्लागार मानसशास्त्रज्ञ, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कार्यरत आहेत )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 8:29 am

Web Title: are you suffering from corona phobia what is corona phobia nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या सहजपणे : ठीक झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का?
2 समजून घ्या सहजपणे : करोनाचा कर्दनकाळ… साबण!
3 समजून घ्या सहजपणे : लाखोंचा बळी घेणारं कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय?
Just Now!
X