बंगळुरूतील २२ वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात अटक केली. तिने शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट संपादित करून बदल केले आणि पुढे पाठवली. जी नंतर ग्रेटा थनबर्गनेही ट्विट केली होती, असा आरोप तिच्यावर आहे. दिशाच्या अटकेनंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकांच्या मनात टुलकिटबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. टूलकिट नेमकी कशासाठी असते आणि त्यात काय असतं, असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत.

कृषी कायदे रद्द करा, अशी मागणी करत दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलनाला दोन महिने उलटले, तरी सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली. त्यात हिंसाचार उफाळला आणि सरकारनं आंदोलन स्थळी अधिक निर्बंध घातले. यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले. यात पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकऱ्यांना समर्थन दिलं. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनासंदर्भात एक टूलकिटही ट्विट केली होती. जी नंतर डिलीट करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची चर्चा झाली. दिशाच्या अटकेनंतर हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला.

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
Here's Why You Should Never Reheat Cooking Oil
Reusing Cooking oil: एकदा वापरलेल्या तेलाचा सतत वापर करता का? आरोग्यासाठी ठरू शकते घातक
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

टूलकिट म्हणजे नेमकं काय, त्यात काय असतं?

जगाच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं आंदोलन होत असतात. मग ते अमेरिकेतील black lives matter असो वा लॉकडाउन विरोधी आंदोलन… पर्यावरणाशी निगडित climate strike campaign असो किवा दुसरं कुठलं आंदोलन. अशा स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम (action points) तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणं वा तीव्र करणं करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं जातं. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम (action points) नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं.

‘टूलकिट’चा वापर कशासाठी आणि कसा केला जातो?

आंदोलनाची पोस्टर वा पत्रक अनेकदा बघायला मिळतात. ज्यात लोकांना आवाहन केलं जातं. त्याचच सोशल मीडियातील स्वरूप म्हणजे टूलकिट असते. ज्या लोकांच्या सहभागामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू शकते वा त्यांची मदत आंदोलनासाठी होऊ शकेल अशा लोकांना टूलकिट शेअर केली जाते. टूलकिट आंदोलनाच्या रणनीतीचा एक भागच असते, असंही म्हणता येईल. आंदोलकांमध्ये समन्वय साधण्याचं काम टूलकिटच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर आंदोलनासंदर्भात काय लिहिलं जाऊ शकतं. कोणते हॅशटॅग वापरायला हवे. कोणत्या वेळेत ट्विट केल्यास फायदा होऊ शकतो आणि कुणाचा उल्लेख ट्विटमध्ये वा फेसबुक पोस्टमध्ये केल्यास प्रभावी ठरेल, अशी माहिती असते.

टूलकिटचा परिणाम काय होतो?

सोशल मीडियावर अनेकवेळा आपल्याला वेगवेगळे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये असल्याचं बघायला मिळतं. एकाचवेळी अनेकांनी ट्विट करून तो हॅशटॅग वापरल्यानं हा परिणाम दिसून येतो. टूलकिटच्या माध्यमातून लोकांना समर्थन देण्याचं आवाहन करण्याबरोबरच त्या आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग वापरून ट्विट करण्याचं आवाहन केलं जातं. आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावरील लोकांचं याकडे लक्ष वेधलं जातं. महत्त्वाचं म्हणजे टूलकिट फक्त आंदोलनासाठीच वापरली जाते असं नाही. तर राजकीय पक्षांकडून मोठ्या कंपन्यांकडूनही त्याचा वापर केला जातो. विविध कार्यक्रमा प्रसंगी, अभियानावेळी वा एखाद्या घटनेनंतर टूलकिटचा वापर केला जातो.