Coronavirus Update: देशात करोनाचा उद्रेक होऊन तीन वर्ष सरली असली तरी अद्यापही धोका कायम आहे. २७ जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीनंतर अजूनही करोना पूर्णपणे संपलेला नसल्याची प्रतिक्रिया समोर आली होती. करोना व्हायरसचे अल्फा आणि गॅमा व्हेरियंट पसरण्याचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी जगातून करोना नाहीसा होण्यास अजून बरीच वाट पाहावी लागणार असल्याचे समजतेय. अशातच आता नव्याने झालेल्या अभ्यासक्रमातून समोर आलेल्या माहितीनुसार करोनाचे अल्फा गॅमा व्हेरियंटचे विषाणू मानवी संक्रमणाच्या पाठोपाठ पांढर्‍या शेपटीच्या हरणांमध्ये प्रसारित आणि विकसित होत होते. अद्यापही या विषाणूचा प्रसार प्राण्यांमध्ये होत असल्यास पुन्हा एकदा जगावर करोनाचे संकट येऊ शकते.

कॉर्नेल विद्यापीठातील विषाणू तज्ञ आणि अभ्यासाचे लेखक डॉ डिएगो डिएल यांनी मंगळवारी प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये यासंदर्भातील अभ्यास प्रकाशित केला. डिसेंबर 2021 पर्यंत गोळा केलेल्या नमुन्यांवर आधारित पुरावे सांगतात की हरीण हा विषाणूचा साठा आणि भविष्यातील प्रकारांचा संभाव्य स्त्रोत असू शकतो, जो मानवी लोकसंख्येमध्ये परत येऊ शकतो.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?

हरीण आणि करोना व्हायरस यांच्यातील संबंध काय?

हरणांच्या अभ्यासात असे दिसून आले की, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामधील पांढर्‍या शेपटीच्या हरणांमध्ये करोना व्हायरसचा प्रसार झाला आहे, यामुळे आणि हरणं एकमेकांमध्ये विषाणू पसरवू शकतात. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार जेव्हा लोक हरणांना खायला देतात किंवा हरणं कचऱ्यातील विषाणू बाधित वस्तूंच्या संपर्कात येतात तेव्हा हा प्रसार झालेला असावा. हरणांमध्ये पसरलेला विषाणू हा माणसाच्याच माध्यमातून आला असला तरी तो नेमका कोणत्या पद्धतीने पसरले हे खात्रीशीर सांगता येत नाही.

संक्रमित हरणांपासून मानवांना किती धोका आहे हे अद्याप स्पष्ट नाही. शास्त्रज्ञांनी ओंटारियोमध्ये हरीण-ते-मानव संक्रमणामुळे करोनाबाधित झालेल्या एका व्यक्तीचे प्रकरण हाताळले होते. यातून समोर आलेल्या माहितीनुसार, शिकारी आणि इतर व्यक्ती जे प्राण्यांशी नियमित संपर्क साधतात त्यांना प्राण्यांकडून करोनाची लागण होऊ शकते असे निकष अभ्यासक मांडत आहेत.

हरीण आणि करोना व्हायरस: अभ्यास कसा केला गेला?

नवीन अभ्यासासाठी, डायल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी २०२० आणि २०२१ मधील सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत न्यूयॉर्क राज्यातील शिकार झालेल्या हरणांच्या सुमारे ५, ५०० ऊतींचे नमुने तपासले.

२०२० च्या हंगामात, फक्त ०.६ % नमुने हे करोना पॉजिटीव्ह दिसून आले होते, तर २०२१ मध्ये ही टक्केवारी २१ % पर्यंत पोहोचली होती.अनुवांशिक अनुक्रमाने असे दिसून आले की करोनाचे तिन्ही व्हेरियंट म्हणजेच अल्फा, गॅमा आणि डेल्टा – हे सर्व २०२१ पर्यंत हरणांमध्ये सुद्धा संक्रमित झाले होते.

दरम्यान या काळात डेल्टा न्यूयॉर्कच्या रहिवाशांमध्ये पसरत होता होता. परंतु अल्फा आणि गॅमाचे संक्रमण काही प्रमाणात कमी झाले होते, विशेषत: राज्याच्या ग्रामीण भागात जिथे संक्रमित हरीण आढळले तिथे व्हायरसची उपस्थिती अगदीच नगण्य होती. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे शिफारस करतात की हरणांच्या शिकारींनी संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी मूलभूत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हे ही वाचा<< विश्लेषण: गायी व मेंढ्यांच्या ढेकर देण्याने, लघवीने हवामानाला कसा धोका पोहोचतो?

दरम्यान,भारतात करोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनमुळे व्हेरिएंटमुळे २०२१ च्या अखेरीस आली असली तरी ती अल्पकाळ टिकली. यामध्ये करोनाचा उपप्रकार हा डेल्टासारखा घातक नसला तरी संसर्गाचे प्रमाण हे मोठे होते. जानेवारी २०२२ मध्ये या लाटेचा सर्वोच्च बिंदू होता, या महिन्यात २१ लाख लोकं बाधित झाले आणि सात हजार ८०० जणांचा मृत्यू झाला. सध्या भारतात करोनाची रुग्णसंख्या १०० हुन सुद्धा कमी आहे.