How Do Cows Contribute Climate Change: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी ऑस्ट्रेलियन क्लायमेट टेक्नॉलॉजी स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. बीबीसीच्या एका अहवालानुसार.या संस्थेची खासियत अशी की, गायींच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण कमी करण्याबाबत इथे काम केले जाते. २०१५ मध्ये गेट्स यांच्या ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सकडून Rumin8, या स्टार्टअपमध्ये १२ मिलियन डॉलरचा निधी गुंतवण्यात आला होता. Amazon चे मुख्य कार्यकारी जेफ बेझोस आणि अलिबाबाचे सह-संस्थापक जॅक मा यांनी देखील ब्रेकथ्रूला पाठिंबा दिला आहे.

Rumin8 तर्फे हवेतील मिथेनचे प्रमाण कमी करण्यासाठी गायींच्या आहारात फेरबदल करण्याच्या योजना आखल्या जातआहेत. संस्थेतर्फे गायींसाठी पूरक आहार विकसित केला जातो. गायींना दिल्या जाणाऱ्या सप्लिमेंट्समध्ये मुख्यतः लाल समुद्री शैवाल समाविष्ट केले जाते ज्यामुळे गायींमधील मिथेन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट करते असे मानले जाते. पण मुळात गायी आणि अन्य प्राण्यांमुळे वातावरणात मिथेन कसे वाढते हे तुम्हाला माहित आहे का?

Kobi Sabzi Benefits What Changes In Body When You Eat Cabbage Once A week
दर ७ दिवसांनी एकदा कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ मोठे फायदे; एक वाटी भाजीत किती कॅलरीज दडल्यात पाहा
increased risk of dengue Learn about the symptoms and prevention of the disease Pune
डेंग्यूचा धोका वाढला! जाणून घ्या रोगाची लक्षणे अन् प्रतिबंधाविषयी…
benefits of cabbage for face
निरोगी शरीराबरोबरच कोबीची भाजी देईल चमकती त्वचा; जाणून घ्या कसा बनवायचा कोबीचा फेसपॅक
Article about avoid exam result stress
ताणाची उलघड: निकालाचा तणाव टाळण्यासाठी…
what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?
control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
Mumbaikars suffer from sore throat due to rising temperature
वाढत्या तापमानामुळे मुंबईकर घसादुखीने हैराण

गायी व अन्य प्राण्यांमुळे हवेत मिथेन कसे वाढते?

रुमिनंट प्रजातीच्या गायी तृणभक्षी आहेत. गाई, मेंढ्या, शेळ्या आणि म्हशींसारख्या रुमीनंट्समध्ये एक विशेष प्रकारची पचनसंस्था असते. रुमिनंट प्राण्यांच्या पोटात चार कप्पे असतात, त्यापैकी एक, रुमेन, त्यांना अर्धवट पचलेले अन्न साठवण्यास आणि ते आंबवण्यास मदत करते. हे अर्धवट पचलेले आणि आंबवलेले अन्न प्राणी पुन्हा चघळतात आणि पचन प्रक्रिया पूर्ण करतात.

तथापि, रुमेनमध्ये गवत आणि इतर वनस्पती आंबतात ज्यातून मिथेन वायू तयार होतो. गायी आणि मेंढ्या यांसारखे प्राणी हे मिथेन प्रामुख्याने बर्पिंगद्वारे म्हणजेच गुरगुरुन व ढेकर देऊन बाहेर उत्सर्जित करतात. दुग्धउत्पादक देशांमधील शेतात मोठ्या प्रमाणात गुरेढोरे आणि मेंढ्यांचे प्रमाण पाहता, हे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. असा अंदाज आहे की मानवी क्रियाकलापांमधून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनांपैकी २७ टक्के उत्सर्जनासाठी रुमिनंट पचनसंस्था जबाबदार आहे.

मिथेनमुळे वातावरणाला काय धोका आहे?

मिथेन हा हवामान बदलाचे मुख्य कारणांपैकी एक आहे. मिथेन हे पूर्व औद्योगिक काळापासून तापमानवाढीसाठी ३० टक्के जबाबदार आहे. कार्बन डाय ऑक्साईडनंतर मिथेन प्रदूषण वाढवण्यात दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामच्या अहवालानुसार, येत्या २० वर्षांच्या कालावधीत, कार्बन डायऑक्साइडपेक्षा मिथेन तापमानवाढीसाठी ८० पट अधिक शक्तिशाली आहे.

भू-स्तरीय ओझोनच्या रूपात पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अगदी वर तयार होणारा एक रंगहीन आणि अत्यंत त्रासदायक वायू तयार करण्याचे काम मिथेन करते. २०२२ च्या अहवालानुसार, जमिनीच्या पातळीच्या ओझोनमुळे दरवर्षी १ दशलक्ष अकाली मृत्यू होऊ शकतात.

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की अलिकडच्या वर्षांत वातावरणातील मिथेनचे प्रमाण वेगाने वाढले आहे. २०२२ मध्ये, यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने सांगितले की, २०२१ मध्ये मिथेनच्या वातावरणातील पातळीत प्रति अब्ज १७ टक्क्यांनी वाढ झाली होती. कार्बनडाय ऑक्साईड वातावरणात मिथेनपेक्षा जास्त काळ राहतो. वातावरणात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी मिथेन २५ पट अधिक शक्तिशाली आहे. असं असूनही हवामान बदलाच्या दरावर त्याचा अल्पकालीन प्रभाव आहे.

हे ही वाचा<< विश्लेषण: पद्म पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? हा पुरस्कार नाकारणारे चार भारतीय कोण होते?

प्राण्यांमधून उत्सर्जित होणारा मिथेन कसा कमी करता येईल?

रुमिनंट प्रजातींमधून मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी आहारातील उपाय शोधणारा Rumin8 हा पहिला स्टार्ट अप नाही. शास्त्रज्ञ गेल्या काही काळापासून यावर काम करत आहेत, या प्राण्यांमधून कमी गॅस उत्सर्जन होईल यासाठी योजना बनवण्याचा विचार होत आहे.

PLUS ONE या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०२१ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की गायींच्या खाद्यामध्ये सीवेड जोडल्याने त्यांच्या आतड्यांमधील मिथेनची निर्मिती ८० टक्क्यांहून अधिक कमी होऊ शकते.

याशिवाय संशोधक या प्राण्यांमधील मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी जनुक (Gene- Modifying) तंत्र सुधारण्याचे प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी, न्यूझीलंडमधील शास्त्रज्ञांनी घोषित केले की त्यांनी कमी प्रमाणात मिथेन उत्सर्जित करणार्‍या मेंढरांची संख्या वाढवली आहे. हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी हा जगातील पहिला अनुवांशिक कार्यक्रम सुरू केला होता.

विश्लेषण: साधी फुलबाग ते आता QR कोडची झाडे, राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यानाचं रूप कसं पालटलं?

या समस्येवर धोरण-संबंधित उपाय शोधणाऱ्या पहिल्या राष्ट्रांपैकी न्यूझीलंड देखील एक आहे. ऑक्‍टोबर २०२२ मध्‍ये, या देशात शेतातील जनावरे ढेकर आणि लघवी करण्‍यापासून निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंवर कर आकारण्‍याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. तत्कालीन पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी सांगितले होते की करांमधून उभारलेल्या पैशाचा वापर “शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि इन्सेन्टिव्ह देण्यासाठी” केला जाईल.