प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नाथ (केके) याच्या आकस्मिक निधनाने कोलकाता येथील एका कार्यक्रमाच्या व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे आणि केकेला रुग्णालयात नेण्यापूर्वी काय घडले हे शोधण्यासाठी ते सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

‘वॉईज ऑफ लव्ह’ अशी ओळख असणारे कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’याच्या मृत्यूमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.

‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं

ज्या ठिकाणी केकेने शेवटचा कार्यक्रम केला त्याठिकाणी वातानुकूलित यंत्रणा काम करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या संदर्भात व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आले आहेत ज्यात केके घाम पुसताना दिसत आहे. यानंतर कोलकातामधील उष्ण वातावरण आणि आर्द्रता पाहता कार्यक्रमाचे ठिकाण त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त भरलेले होते असा आरोप केला जात आहे.

उष्णता, अस्वस्थतेमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकत नाही. उष्णता जाणवणे आणि घाम येणे ही खरे तर येऊ घातलेल्या हृदयविकाराची लक्षणे आहेत, त्याचे कारण नाही. “तीव्र उष्णतेमध्ये घराबाहेर राहिल्याने निर्जलीकरण होऊ शकते आणि हृदयाचे नुकसान होऊ शकते, परंतु हे फारसे सामान्य नाही,” असे नवी दिल्लीतील पार्क हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जे के शर्मा यांनी सांगितले. हृदयविकाराचा झटका हा दीर्घकाळ खराब जीवनशैली आणि वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे, असेही ते म्हणाले.

“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?

“सोप्या भाषेत, आपल्या येथील तरुण लोकसंख्येला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक आहे. जर तुम्ही वयाच्या ४० वर्षापूर्वी हृदयविकाराचा झटका आलेल्या लोकांची संख्या पाहिली तर ती पाश्चात्य देशांच्या तुलनेत चौपट आहे. खरं तर त्यांच्याकडील (पश्चिमेकडील) तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण कमी होत आहे, तर आपल्याकडे वाढत आहे,” असे डॉ शर्मा म्हणाले.

कालांतराने हृदयाला इजा होत असल्याने लहानपणापासूनच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “जर तुम्हाला आज हृदयविकाराचा झटका आला असेल तर याचा अर्थ असा नाही की आजच तुमच्या हृदयाची स्थिती खराब झाली. हे अनेक वर्षे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आहेत,” असेही डॉ. शर्मा म्हणाले.

हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान काय होते, ज्याला वैद्यकीयदृष्ट्या मायोकार्डियल इन्फार्क्शन (एमआय) म्हणतात?

एमआयला सामान्यतः हृदयविकाराचा झटका म्हणतात. हा हृदयाच्या भिंतीच्या मध्यभागी असलेल्या हृदयाच्या स्नायूच्या (मायोकार्डियम) भागामध्ये रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे किंवा ब्लॉक झाल्यामुळे होतो. हे स्नायू हृदयाला रक्त पंप करण्याचे काम करत असतात.

जेव्हा कोरोनरी धमनीमध्ये अडथळा येतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा खंडित होतो. ऑक्सिजनयुक्त रक्ताच्या दीर्घकालीन अभावामुळे हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊ शकते. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा थांबल्याने हृदयाच्या स्नायूंना इजा होते आणि स्नायूमधून विशिष्ट रसायने स्रवतात. यामुळे वेदना होतात.

Video : कधी घाम पुसताना तर कधी पाणी पिताना दिसला ‘केके’, असे होते अखेरचे काही क्षण

“जेव्हा आपण जन्माला येतो, तेव्हा आपल्या धमन्या गुळगुळीत आणि लवचिक असतात, त्यामुळे रक्त प्रवाह खूप चांगला होतो. कालांतराने, रक्तवाहिन्यांच्या आतील भागात कोलेस्टेरॉल जमा होते. याची मुख्य कारणे वय, आरोग्याची स्थिती, मधुमेह, कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, तंबाखूचे सेवन, तणाव, बैठी जीवनशैली आणि अनुवांशिकता आहेत,” असे अहमदाबादच्या अपोलो सीव्हीएचएफ हार्ट इन्स्टिट्यूटचे सीईओ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ समीर दाणी यांनी सांगितले.

“धमनीजवळ सतत कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे, हृदयाच्या स्नायूंच्या आतील बाजूस अडथळा येतो, ज्यामुळे रक्त गोठते. ज्या वेळी या धमनीला अडथळा येतो, तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे ही प्रक्रिया हळूहळू होत असली तरी हृदयविकाराचा झटका अचानक येतो,” असे डॉ. समीर दाणी म्हणाले. हृदयविकाराचा झटका हा छातीत दुखण्यापासून ते मान, जबडा, खांदा किंवा हातापर्यंत पसरू शकते.

विश्लेषण : हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणे यात फरक काय?

सर्व हृदयविकार मायोकार्डियल इन्फार्क्शन आहेत का?

सर्व हृदयविकाराचे झटके मुळात एमआय असतात. पण हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडणे (कार्डियाक अरेस्ट) हे दोन्ही विकार वेगळे आहेत.

“८०-९० टक्के प्रकरणांमध्ये वेळा अचानक हृदयविकाराचा झटका येतो, परंतु सुमारे १५-२० टक्के प्रकरणांमध्ये, हृदयविकाराचा झटका न येता किंवा हृदयाचे कार्य थांबते. अचानक रक्त पंप करण्यामध्ये अनियमिता आल्याने हे घडते. हृदयाच्या झडपा, स्पंदनांशी निगडित आजार, यामुळे यामध्ये अनियमितता येते,” असे डॉ दानी म्हणाले.

काही लोक हृदयविकाराच्या झटक्यातून कसे वाचतात?

एखाद्या व्यक्तीला सौम्य हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, जो तेव्हा जाणवत नाही. कारण त्यावेळी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत आणि केवळ ईसीजीमध्येच ते आढळून येते. सामान्यतः मधुमेहींमध्ये हे दिसून येते, पण हे कोणालाही होऊ शकते,” डॉ दानी म्हणाले.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर जगण्याची शक्यता दोन घटकांवर अवलंबून असते. “जर हृदयाच्या स्नायूंना खूप मोठे नुकसान झाले असेल, तर मृत्यूची शक्यता जास्त असते. जर तुमची सक्रिय जीवनशैली असेल तर हृदयविकाराच्या झटक्यातून वाचण्याची शक्यता जास्त आहे,” असे डॉ दानी म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained can heat and humidity cause a heart attack like kk abn
First published on: 03-06-2022 at 16:10 IST