प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर दोन मोठे गॅंगस्टर चर्चेत आहेत. एक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ज्याच्या टोळीने मूसवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे आणि दुसरा गँगस्टर नीरज बवाना, ज्याने सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर सूड घेण्याची घोषणा केली आहे. हे गुंड तुरुंगात असूनही सक्रिय असून तुरुंगातूनच त्यांची टोळी चालवतात. पण या गुन्हेगारांना, पोलीस गॅंगस्टर कसे घोषित करतात?

गँगस्टर म्हणजे काय

भारतात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात सरकारने १९८६ मध्ये गँगस्टर कायदा बनवला आणि त्याची अंमलबजावणी केली. गँगस्टर  अ‍ॅक्ट १९८६ नुसार, एक किंवा अधिक व्यक्तींचा समूह जो गुन्हेगारीच्या मार्गाने अवाजवी फायदा मिळवतो किंवा कायद्यात नमूद केलेला गुन्हा करतो, त्याला गॅंगस्टर म्हटले जाते. मग तो कोणताही गुन्हा असो.

विश्लेषण: मुसेवालांची हत्या AN-94 ने; जाणून घ्या मिनिटाला १८०० गोळ्या झाडणाऱ्या या रशियन रायफलचं चीन, पाकिस्तान कनेक्शन

गॅंगस्टर किंवा गुंड म्हणजे गुन्हेगार, जो टोळीचा सदस्य असतो. बहुतांश टोळ्या संघटित गुन्हेगारीचा भाग मानल्या जातात. गॅंगस्टरच्या टोळ्या वैयक्तिक गुन्हेगारापेक्षा खूप मोठे आणि गुंतागुंतीचे गुन्हे करतात. गॅंगस्टर हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील देशांमध्ये सक्रिय आहेत.

पोलीस घोषित करतात गॅंगस्टर

उत्तर प्रदेश पोलीस दलातील एक अधिकारी, पोलीस निरीक्षक बीआर झैदी यांनी सांगितले की, खून, दरोडा, खंडणी इत्यादीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये एक किंवा अधिक व्यक्ती सामील आहेत, जे आपल्या उदरनिर्वाहासाठी गुन्हे करतात. तसेच ज्यांचे उपजीविकेचे साधन हा गुन्हा आहे आणि ते गुन्हा करून मालमत्ता कमावतात आणि जर त्यांनी मालमत्ता मिळवण्याच्या उद्देशाने गुन्हे केले तर ते गॅंगस्टरच्या श्रेणीत येतात.

गॅंगस्टरवरील कारवाईसाठी एक किंवा अधिक गुन्हे असू शकतात. यामध्ये एक गुन्हेगार जो टोळी म्हणून काम करतो आणि साथीदार बदलून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना करतो. अशा व्यक्तीला गॅंगस्टर ठरवण्यासाठी, संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी एसएचओ एक तक्ता तयार करतात, ज्याला गॅंग चार्ट म्हणतात.

विश्लेषण : सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर सूड घेण्याची घोषणा केलेली बंबिहा गॅंग कोणाची आहे?

पोलीस निरीक्षक झैदी म्हणाले की, त्या गॅंग चार्टमध्ये, गुन्हा करणाऱ्या व्यक्ती किंवा आरोपींचा समूह, त्यांची नावे आणि गुन्ह्याचा तपशील नोंदवला जातो. यामध्ये टोळी चालवणारा गुन्हेगार टोळीचा म्होरक्या म्हणून दाखवला जातो. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध आरोपपत्र असणे आवश्यक असते, जे न्यायालयात दाखल झालेले असते.

एसएचओ हा चार्ट त्याच्या वरिष्ठांना सादर करतो. हा चार्ट पोलीस अधीक्षक यांच्याकडून जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतो. जिल्हा दंडाधिकारी त्या गॅंग चार्टचा अभ्यास करतात आणि तपासणी करतात. जर त्यांना वाटले की आरोपी गँगस्टर कायद्याखाली येत आहे, तर ते गॅंग चार्टला मंजुरी देतात. अशा प्रकारे आरोपीला गॅंगस्टर घोषित केले जाते.

विश्लेषण : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करणारा कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार कोण आहे?

२०१५ मध्ये गँगस्टर कायदा मजबूत करण्यात आला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशात तत्कालीन सरकारने गँगस्टर कायद्यात सुधारणा केली होती. उत्तर प्रदेशात सामाजिक विरोधी क्रियाकलाप (प्रतिबंध) (सुधारणा) अध्यादेश २०१५ ला तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांनी मान्यता दिली होती. यानंतर गँगस्टर कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली. गँगस्टर कायद्यांतर्गत दोषी ठरलेल्या गुन्हेगाराला किमान दोन वर्षे आणि कमाल दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. यापूर्वी गँगस्टर कायद्यात १५ प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होता. मात्र नंतर त्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढली.