आत्तापर्यंत, तुम्ही कदाचित मदर्स डे  निमित्त तुमच्या आईला शुभेच्छा दिल्या असतील. या दिवसाची आठवण म्हणून इन्स्टाग्रा किंवा फेसबुकवर पोस्ट देखील टाकल्या असतील. पण शक्यता आहे की, मदर्स डेच्या या सर्व सेलिब्रेशनमध्ये, तुम्हाला अ‍ॅना जार्विस हे नाव एकदाही आढळले नसेल.

याचे कारण असे असावे की, ज्या दिवशी जार्विस यांनी हा विशेष दिवस सुरू केला, नंतर त्यांचे त्याच्याशी असलेले नाते गुंतागुंतीचे किंवा त्याऐवजी वाईट झाले. मात्र, ‘मदर्स डे’ला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी जार्विस यांनी अथक परिश्रम घेतले. पण हा  दिवस साजरा करायला सुरुवात झाल्यापासून त्याचे केले जाणारे मार्केटिंग यामुळे त्यांना याचा तिरस्कार होऊ लागला. त्यानंतर त्यांनी हा दिवस सुरू करण्यासाठी त्यांनी जेवढी शक्ती लावली होती, त्याच्या दुप्पट शक्ती आणि पैसे तो बंद करण्यासाठी लावले.

आईचा संघर्ष पाहून कामाला सुरुवात

अ‍ॅना जार्विस यांचा जन्म १ मे १८६४ रोजी झाला, तर २४ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्या एक अमेरिकन कार्यकर्त्या होत्या ज्यांनी १९०८ मध्ये या खास दिवशी स्वतःच्या आणि इतर सर्व मातांचा सन्मान करण्यासाठी मदर्स डेची सुरुवात केली. अ‍ॅना वेस्ट व्हर्जिनियामध्ये लहाणाच्या मोठ्या झाल्या. त्यांचा जन्म झाला तेव्हा गृहयुद्ध चालू होते. त्यांनी आपल्या १३ भावंडांपैकी नऊ भावंडांना गोवर, टायफॉइड यांसारख्या आजारांनी प्राण सोडताना पाहिले.

आई अ‍ॅना रीव्हस जार्विस यांच्या अनुभवांनी प्रेरित होऊन त्यांनी मातृत्वाशी संबंधित बाबींच्या दिशेने काम सुरू ठेवले. गृहयुद्धादरम्यान महिलांना स्वच्छतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करून आणि दोन्ही बाजूंच्या मातांचे गट तयार करून बालमृत्यू रोखण्यासाठी त्यांनी महिलांमध्ये काम केले. त्यामुळे दोन्ही बाजूंमधील मतभेद दूर होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.

असा दिवस साजरा व्हावा, अशी आईची तीव्र इच्छा

अ‍ॅना यांच्यावर त्यांच्या आईचा खूप प्रभाव होता. त्यांन एकदा त्यांच्या आईचे म्हणणे ऐकले की मला आशा आहे की कोणीतरी, कधीतरी, एक संस्मरणीय मातृदिन साजरा करेल, जो तिच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवतेसाठी केलेल्या अतुलनीय सेवेची आठवण करून देईल, कारण ती त्याच्यासाठी पात्र आहे. १९०५ मध्ये अॅना यांच्या आईचे निधन झाल्यावर त्यांनी आपल्या आईची ही इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात केली. त्यांनी राजकारणी, व्यापारी आणि चर्चच्या नेत्यांना पत्रे लिहून या संदर्भात त्यांची मदत मागितली. दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा मातांसाठी समर्पित दिवस म्हणून साजरा केला जावा, असे आवाहन त्यांनी केले. या दिवशी एक पांढरे कार्नेशन फूल, जे त्यांच्या आईचे आवडते फूल होते, या विशेष दिवसाचे प्रतीक बनले.

रविवारची सुट्टी असल्याने अ‍ॅना यांचे काम सोपे झाले

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अ‍ॅना यांचे काम सोपे झाले. तसे, अ‍ॅना यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार एका खास कारणासाठी निवडला. वास्तविक, त्यांच्या आईचे ९ मे रोजी निधन झाले आणि मे महिन्याचा दुसरा रविवार याच सुमारास येईल असा विश्वास त्यांना होता. १९०८ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा करण्याची घोषणा सर्व चर्चने केली आणि सुमारे सहा वर्षांनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष बुद्रो विल्सन यांनी ८ मे १९१४ रोजी हा विशेष दिवस साजरा करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. अशाप्रकारे मदर्स डे साजरा करण्यासाठी कायदाही करण्यात आला. याशिवाय अॅना जार्विस यांनी अनेक दिग्गज राजकारणी, व्यापारी आणि व्यक्तिमत्त्वांचा पाठिंबाही मिळवला होता.

कार्नेशन फुलांचे वाटप केले आणि त्याचे मार्केटिंग सुरू झाले

यानंतर त्यांचा या दिवस साजरा करण्यावरुन भ्रमनिरास सुरू झाला. अ‍ॅना यांनी मदर्स डेला आपल्या आईच्या आवडत्या कार्नेशनच्या फुलांचे वाटप केले होते, त्यामुळे या फुलांचा काळाबाजार सुरू झाला. ते जादा किमतीत विकले जाऊ लागले. या दिवसाच्या नावाने चॉकलेट्स, महागड्या भेटवस्तू आणि पार्टी सुरू झाली, ज्यामुळे अ‍ॅना दुखावल्या. त्रासलेल्या अ‍ॅनांनी त्याला विरोध करून मदर्स डे बंद करण्याची मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत संघर्ष केला. १९४४ मध्ये त्यांच्याकडे संबंधित ४४ प्रकरणांची फाइल होती आणि ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगण्यात येते. नंतर १९४८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि तोपर्यंत खटले प्रलंबित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅना यांच्या समर्थनार्थ नातेवाईकांनीही त्यांना पाठिंबा देत हा दिवस साजरा करणे बंद केले. त्यांचे अ‍ॅना यांच्यावर खूप प्रेम होते आणि ते खूप आदराने मातृदिन साजरा करत असत, पण अ‍ॅना यांचा याला विरोध होता, म्हणून त्यांनी तो साजरा करणे देखील बंद केले. अ‍ॅना यांचे शेवटचे वंशज १९९० मध्ये मरण पावले आणि आता त्यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये कोणीही हयात नाही.