युक्रेनमध्ये शिरकाव करत रशियाने छेडलेल्या युद्धाला आता दोन महिने झाले आहेत आणि रशियाला अजुनही निर्णायक विजय मिळालेला नाही. विविध मार्गांचा अवलंब करत युक्रेनचे सैन्य हे अजुनही रशियाच्या पुढे तग धरुन आहे. गेले काही दिवस शहरांबाहेर सुरु असलेली लढाई आता शहरांमध्ये , शहरांतील रस्त्यांवर लढली जात आहे. युक्रेनच्या सैन्याचा चिवट प्रतिकार आणि त्यांना मिळणारी नागरीकांची साथ लक्षात घेता रशियाने छर्रेयुक्त बॉम्बचा ( flechettes ) सर्रासपणे वापर करायला सुरुवात केली आहे. आता सर्वसाधारण बॉम्ब फुटल्यावर स्फोटामुळे बॉम्बचे तुकडे इतरत्र वेगाने फेकले जातात, पसरले जातात. मात्र हा छर्रेयुक्त बॉम्ब काहीसा वेगळा आहे. अजुनही ताब्यात न आलेल्या शहरांवर बुचा, कीव्ह या शहरालगत या छर्रे बॉम्बचा वापर रशिया करु लागला असल्याचं समोर आलं आहे.

छर्रेयुक्त बॉम्बचे वैशिष्ट्य काय आहे ?

साधारण २२५ किलो वजनाचा हा बॉम्ब लढाऊ विमानातून, तोफेतून अगदी उखळी तोफेतून सहजपणे फेकला किंवा डागला जाऊ जातो. सर्वसाधारण बॉम्बमध्ये स्फोटकं असतात ज्याचा आघातमुळे किंवा विशिष्ट टायमरनुसार स्फोट होतो. अशा बॉम्बची तीव्रता ही स्फोटकांमुळे जास्त असते. आगीचे लोळ, उष्णता, आवाजाची जोरदार लाट यामुळे परीसराचे नुकसान होते. तर छर्रेयुक्त बॉम्बमध्ये अणकुचीदार असे ३ सेंटीमीटर ते १२ सेंटीमीटरचे किंवा त्याहून जास्त लांबीचे असंख्य तुकडे, जे बुहतांश वेळा स्टीलयक्त धातुचे असतात, जे स्फोटामुळे अत्यंत वेगाने सर्व बाजुंना पेकले जातात. छर्रेयुक्त बॉम्ब ज्या ठिकाणी पडतात त्या भागाचे नुकसान कमी होते मात्र अणकुचीदार अशा तुकड्यांमुळे मनुष्यहानी जास्त होऊ शकते. त्यातही माणसे मरण्यापेक्षा जबर जखमी होण्याचे प्रमाण हे जास्त असते. यामुळेच शहरी भागात किंवा शहरी भागाजवळ युद्ध करतांना रशिया या बॉम्बचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. कारण अनेक इमारतींच्या भिंतीवर किंवा मृत/जखमी सैनिकांमध्ये असे तुकडे आढळले आहेत. इस्त्राईलनेही या बॉम्बचा वापर अनेकदा पॅलेस्टाईनविरुद्धच्या संघर्षात केला आहे.

अशा शस्त्राचा वापर याआधी तोफगोळ्यांमध्ये केला जायचा, अणकुचीदार तुकड्यांऐवजी गोल तुकड्यांचा वापर केला जायचा. इटलीमध्ये १९ व्या शतकात छर्रेयुक्त बॉम्ब विकसित करण्यात आला. त्यांनतर पहिल्या महायुद्धात या संलकल्पनेवर आधारीत विविध बॉम्ब विकसित करत ते वापरण्यात आले. पण ते इतर पांरपारीत बॉम्बच्या तुलनेत तेवढे प्रभावी ठरले नाहीत. अमेरीकेने विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर यामध्ये बरेच बॉम्बमध्ये बदल केले आणि निर्णायक क्षणी वापरले. एकाच वेळी ४ सेंटीमीटरपेक्षा जास्त लांबीचे १० हजार तुकडे फेकले जातील असेही बॉम्ब विकसित करत वापरले. आवाज न करता स्फोट होत परिणाम साधण्याची प्रभावी क्षमता लक्षात घेता या बॉम्बला Lazy Dog असंही नाव देण्यात आलं. अमेरीकेने हा प्रयोग प्राण्यांवर करत विविध क्षमतेचे बॉम्ब वापरत याची तीव्रता तपासली.

ज्याप्रमाणे क्लस्टर बॉम्ब, लॅन्ड माईन ( भू सुरुंग ) वापरु नयेत यासाठी काही मानवधिकार संघटना प्रयत्न करत असतात तसा प्रयत्न हा छर्रेयुक्त बॉम्ब वापरु नये यासाठीही झाले असले तरी अनेक देशांमध्ये शस्त्रांच्या यादीत या बॉम्बने स्थान पटकावलेले आहे. अर्थात हा छर्रेयुक्त बॉम्ब बॉम्ब बनवण्याचा खर्च जास्त असल्याने नेहमीच्या पारंपारीक किंवा आधूनिक बॉम्बसारखा हा बॉम्ब सर्रासपणे बनवला जात नाही. पण युद्ध संपण्याच्या मार्गावर नसल्याने रशियाने आता हे प्रभावी ठरणारे छर्रेयुक्त बॉम्ब नागरी वस्त्यांमध्ये वापरायला सुरुवात केली आहे.