सध्या इंटरनेटवर अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनीच्या अभिनयाने नटलेल्या अॅमेझॉन प्राइमवरील ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजची तुफान चर्चा आहे. अनेकांना ही वेब प्रचंड आवडली असून पहिल्या भागाप्रमाणेच या भागामध्येही गूढ आणि थरार कायम राखण्यामध्ये निर्मात्यांना आणि कलाकारांना यश मिळाल्याचं कौतुक अनेकांनी केलं आहे. मात्र या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच त्यावरुन वाद निर्माण झाला होता. खास करुन दाक्षिणात्य राज्यांमधून खास करुन तमिळ लोकांकडून या वेब सिरीजला विरोध होताना दिसत आहे. या वेब सिरीजला प्रदर्शनाच्या आधीपासूनच का विरोध होत आहे आणि नक्की या विरोधाचं कारण काय आहे हे अनेकांना ठाऊक नाही. त्याचसंदर्भातील हा विशेष लेख. वेब सिरीजचा ट्रेलरसमोर आल्यानंतरच अनेकांना या वेब सिरीजमध्ये तमिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आल्याचा आरोप केला. तमिळ लोकांची नकारात्मक प्रतिमा या वेब सिरीजमुळे तयार होईल असा आरोप अनेकांनी केला. या वेब सिरीजचं कथानकामध्ये श्रीलंकेतील ईलम तमिळ समाजाला आणि 'लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ ईलम' (एलटीटीई) चुकीच्या अर्थाने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. नक्की पाहा >> Photos: ‘फॅमेली मॅन २’ मधील बोल्ड सीन्स चर्चेत; ‘राजी’च्या भूमिकेवर चहाते फिदा या वादानंतर वेब सिरीजचे निर्माते असणाऱ्या राज अॅण्ड डिके यांनी एक अधिकृत पत्रक जारी करुन ट्रेलरमधील काही दृष्यांच्या आधारे हे अंदाज बांधले जात असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आपल्याला तमिळ लोकांबद्दल प्रेम आणि आदर असल्याचंही निर्मात्यांनी म्हटलं होतं. The Family Man 2 : काही झाले करोडपती तर काही लखपती. पाहा कलाकारांच्या मानधनाची आकडेवारी या सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी कलाकारांना किती मानधन देण्यात आलं याची आकडेवारीही समोर आलीय.#Familyman2 #manojbajpayee #samanthaakkineni #Salaries #entertainment — LoksattaLive (@LoksattaLive) June 11, 2021 "ट्रेलरमधील काही शॉर्ट्स आणि दृष्यांच्या आधारे अंदाज बांधण्यात आले आहेत. आमच्या या वेब सिरीजमधील अनेक कलाकार आणि पडद्यामागील महत्वाच्या व्यक्ती तसेच लेखक हे तमिळ आहेत. आम्हाला तमिळ लोकांबद्दल त्यांच्या संस्कृतीबद्दल खूप आदर आहे. आम्हाला तमिळ लोकांबद्दल केवळ प्रेम आहे. आम्ही या वेब सिरीजसाठी अनेक वर्षांची मेहनत घेतलीय. एक संतुलित, संवेदनशील आणि छान कथा आम्ही प्रेषकांसाठी घेऊन आलोय. या सिरीजच्या पहिल्या भागाप्रमाणेच हा भागही रंजक आहे. जेव्हा ही सिरीज प्रदर्शित होईल तेव्हा सर्वांनी ती पहावी अशी आम्ही विनंती करतो. एकदा तुम्ही ही सिरीज पाहिली की तुम्ही त्याचं कौतुक कराल हे आम्हाला ठाऊक आहे," असं या पत्रकात म्हटलं होतं. View this post on Instagram A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj) आता ही सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या सिरीजसंदर्भात सकारात्मक रिव्ह्यू पोस्ट केले असून मनोज वाजपेयी आणि समंथा अक्किनेनीच्या अभिनयाचं सर्वच स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे. मात्र असं असतानाही काही तमिळ लोकांनी या सिरीजला विरोध कायम ठेवला आहे. काहींनी तर या सिरीजवर बंदी आणण्याचीही मागणी केलीय. या सिरीजमध्ये तमिळ लोकांचा अनेकदा अपमान करण्यात आला असून तमिळ संस्कृतीचाही अफमान करण्यात आल्याचा दावा केला जातोय. तमिळ समाज हे सहन करणार नाही असं या सिरीजला विरोध करणाऱ्यांनी म्हटलं आहे. (फोटो ट्विटरवरुन साभार) ‘द फॅमिली मॅन २’चं दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा यांनी केलं आहे. तर राज आणि डीके हे या सीरिजचे निर्माते आहेत. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयी आणि समंथा अक्किनेनी यांच्यासोबतच प्रियामनी, शारिब हाश्मी, सीमा बिश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.