चिन्मय पाटणकर

तापमान, हवेतील आर्द्रता किंवा वायू प्रदूषणाची पातळी दर्शवणारे डिजिटल फलक (डिजिटल डिस्प्ले) अनेक ठिकाणी बसवण्यात आले आहेत. त्याशिवाय आता या सुविधा मोबाईलमध्ये किंवा स्मार्ट घड्याळांमध्येही उपलब्ध झाल्या आहेत. मात्र देशाची किंवा राज्याची लोकसंख्या सार्वजनिकरित्या दर्शवण्यासाठी लोकसंख्या दर्शक घड्याळाचा (डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक) वापर केला जातो, ते मात्र तितकेसे ज्ञात नसते. आता त्या दृष्टीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे लोकसंख्या दर्शक घड्याळे देशभरात बसवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील दुसरे आणि पुण्यातील पहिले लोकसंख्या दर्शक घड्याळ नुकतेच लोकसंख्या संशोधन केंद्र, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत बसवण्यात आले. त्यामुळे लोकसंख्या दर्शक घड्याळाविषयी अधिक जाणून घेणे आवश्यक ठरते.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
ILO report
विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

सध्या देशात एकूण लोकसंख्या दर्शक घड्याळे किती ?

सध्या देशात चार ठिकाणी लोकसंख्या दर्शक घड्याेळ कार्यान्वित आहेत. भारतात सर्वांत पहिल्यांदा मुंबईच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स या संस्थेत लोकसंख्या दर्शक घड्याळ बसवण्यात आले. या घड्याळाद्वारे देशाची लोकसंख्या दर्शवली जाते. त्याशिवाय दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आणि लखनऊ विद्यापीठ या दोन ठिकाणीही लोकसंख्या दर्शक घड्याळ बसवण्यात आले आहे. आता चौथे घड्याळ पुण्यातील लोकसंख्या संशोधन केंद्र, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत नुकतेच बसवण्यात आले. हे पुण्यातील पहिलेच लोकसंख्या दर्शक घड्याळ आहे.

पुण्यातील घड्याळाचे वेगळेपण काय?

मुंबईतील असे घड्याळ केवळ भारतातील लोकसंख्या दर्शवते. तर पुण्यात बसवण्यात आलेल्या लोकसंख्या दर्शक घड्याळाद्वारे महाराष्ट्राची लोकसंख्याही दर्शवली जाते. पुण्यातील घड्याळाद्वारे पहिल्यांदाच महाराष्ट्राची लोकसंख्या दाखवली जाणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दिवसाची लोकसंख्या आणि काही दिवसांनी क्षणोक्षणीची (रिअल टाइम) लोकसंख्याही दर्शवली जाईल.

क्षणोक्षणीची लोकसंख्या कशी मोजली जाते?

लोकसंख्येच्या वाढीचा अंदाज बांधण्यासाठी गणितीय सूत्राचा वापर करावा लागतो. जनगणना दर दहा वर्षांनी करण्यात येते. त्यामुळे जनगणनेनुसार असलेली, २०११मधील राज्याची किंवा देशाची लोकसंख्या पाया मानून जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचे प्रमाण हे तीन घटक विचारात घेतले जातात. महाराष्ट्रातील लोकसंख्येची दैनंदिन मोजदाद किंवा अंदाज करणे कठीण आहे. कारण महाराष्ट्रात रोजगार-नोकरी-शिक्षणासाठी होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण बरेच जास्त आहे. त्यामुळे गणितीय सूत्राचा आधार घेऊन महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा अंदाज बांधावा लागतो.

या घड्याळाचा उपयोग काय?

देशाची आणि राज्याची लोकसंख्या किती हे कळणे, त्यातून जनजागृती होणे हा मुख्य उद्देश आहे. लोकसंख्या घड्याळाद्वारे वयोगटानुसार लोकसंख्या दाखवता येऊ शकते, जन्मदर, मृत्यूदर दाखवता येऊ शकतो. एकूण रुग्णालये, शाळा आदींची आकडेवारीही या घड्याळाद्वारेच दाखवणे शक्य आहे.

लोकसंख्या दर्शक घड्याळे देशभरात वाढणार?

देशभरातील सोळा राज्यांमध्ये एकूण अठरा लोकसंख्या अभ्यास केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे लोकसंख्या दर्शक घड्याळे बसवली जाणार आहेत. त्यापैकी लखनऊ आणि दिल्ली येथे ती बसवण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित लोकसंख्या संशोधन केंद्रांमध्येही टप्प्याटप्प्याने ही घड्याळे कार्यान्वित करण्यात येतील.