scorecardresearch

Bulli Bai App: मुस्लिम महिलांचे फोटो टाकत लिलाव करणारं हे प्रकरण नेमकं काय आहे?

हे ‘बुली बाई’ प्रकरण नेमकं काय आहे? मुस्लिम महिलांचा लिलाव का केला जात आहे?

Bulli Bai App Case, Bulli Bai App, What is Bulli Bai App, Muslim Women, Auction, हे 'बुली बाई' प्रकरण नेमकं काय आहे, बुली बाई अॅप, बुल्ली बाई अॅप
हे 'बुली बाई' प्रकरण नेमकं काय आहे? मुस्लिम महिलांचा लिलाव का केला जात आहे?

सोशल मीडियावर सध्या एक अ‍ॅप चांगलंच चर्चेत आहे. या अ‍ॅपचं नाव आहे बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App). या अ‍ॅपमुळे मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण असून राजकीय नेत्याकंडूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने २१ वर्षाच्या तरुणाला बंगळुरुमधून ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांची विशेष टीम या तरुणाला मुंबईला आणत असून त्याची चौकशी केली जाणार आहे.

या वादग्रस्त अ‍ॅपसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तक्रारी मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली सुरु केली होती. तसंच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. दरम्यान हे बुली बाई अ‍ॅप प्रकरण नेमकं काय आहे? आणि याचा मुस्लिम महिलांशी काय संबंध आहे? हे जाणून घेऊयात…

काय आहे नेमकं प्रकरण?

मुस्लिम महिलांची सौदेबाजी करणारं एक अ‍ॅप सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. याच अ‍ॅपचं नाव आहे बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App). या अ‍ॅपवर कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केलं जात होतं. या अ‍ॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला.

असा आरोप आहे की, हे बुली बाई अ‍ॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट करत होतं. यानंतर लोकांना या मुस्लिम महिलांच्या लिलावासाठी प्रोत्साहित केलं जात होतं.

याआधीही समोर आलं आहे असं प्रकरण –

असंच एक प्रकरण २०२० मध्ये समोर आलं होतं. त्यावेळी Sulli Deal नावाचं एक अ‍ॅप चर्चेत होतं. या अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता. पण आता एक नवा वाद बुली बाई अ‍ॅपने निर्माण केला आहोत. तुमच्या माहितीसाठी, या बुली बाई अ‍ॅपला Github API वर होस्ट केलं जात होतं. या अ‍ॅपच्या सहाय्याने कथितपणे मुस्लिम महिलांची सौदेबादी होते.

GitHub वर अपलोड झालं अ‍ॅप

Bulli Bai आणि Sulli Deals…दोन्ही अ‍ॅप मायक्रॉसॉफ्ट आणि सॉफ्टवेअर शेअरिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या GitHub वर अपलोड करण्यात आले आहेत. GitHub वर कोणीही या डेव्हलप होत असलेल्या अ‍ॅपला अपलोड किंवा शेअर करु शकतं.

दोन्ही अ‍ॅप्सचा एकच उद्देश

Bulli Bai आणि Sulli Deals मध्ये काही अंतर नाही. या दोन्ही अ‍ॅप्सचा उद्देश मुस्लिम महिलांचं मानसिक आणि शारिरीक शोषण कऱण्याचा उद्देस आहे. दोन्ही अ‍ॅपमध्ये मुस्लिमांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी मुस्लिम महिलांचे फोटो आणि त्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. महिलांच्या ट्विटवर, इन्स्टाग्राम आणि फेबसुकवरुन माहिती घेत आणि त्यांचे फोटो चोरी करत टाकण्यात आले.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत तक्रारी

दिल्लीपासून मुंबईपर्यंत महिलांनी याप्रकरणी तक्रारी केल्या आहेत. GitHub वर Bulli Bai नावाचं अ‍ॅप तयार करत हजारो मुस्लिम महिलांचे फोटो टाकण्यात आले. यानंतर त्यांची बोली लावण्यात आली. प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अ‍ॅप तयार करणाऱ्या युजरला GitHub वर ब्लॉक केलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2022 at 11:17 IST
ताज्या बातम्या