scorecardresearch

विश्लेषण : राजू श्रीवास्तव यांच्या शवविच्छेदनात वापरण्यात आलेली virtual autopsy पद्धत नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या

आग्नेय आशियातील एम्स ही एकमेव संस्था आहे जी गेल्या दोन वर्षांपासून आभासी शवविच्छेदन करत आहे,

विश्लेषण : राजू श्रीवास्तव यांच्या शवविच्छेदनात वापरण्यात आलेली virtual autopsy पद्धत नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या
new technique used to perform raju-srivastavas postmortem

प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन ‘राजू श्रीवास्तव’ यांचं बुधवारी २१ सप्टेंबर रोजी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर १० ऑगस्टपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेले अनेक दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. मात्र त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर थांबली. देशाच्या पंतप्रधानांपासून ते अगदी मराठी कलाकारांपर्यंत सर्वांनीच त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. दिल्लीत व्यायाम शाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गुरुवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी एम्स फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, ‘कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे शवविच्छेदन नवे तंत्र वापरून करण्यात आले.’

आभासी शवविच्छेदन म्हणजे काय?

शवविच्छेदनाची एक सामान्यतः असलेली प्रक्रिया सर्व रुग्णालयात केली जाते. मात्र राजू श्रीवास्तव यांच्यावर करण्यात आलेल्या आभासी शवविच्छेदनबद्दल डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की ‘सुरवातीला त्यांना रुग्णालयात आणले गेले तेव्हा ते शुद्धीत नव्हते, आणि ते ट्रेडमिलवर धावताना पडले आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नव्हते. कारण हे वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण बनले होते आणि अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पोलीस शवविच्छेदनचा पर्याय निवडतात. आभासी शवविच्छेदन हे आधुनिक एक्स रे, सिटी स्कॅनच्या मदतीने करता येते. पारंपरिक शवविच्छेदन प्रक्रियेच्या तुलनेत यात वेळ कमी लागतो. ज्यामुळे मृतदेह अंत्यसंस्कार किंवा दफनासाठी लवकर सोडता येतो. शवविच्छेदनाची पारंपरिक प्रक्रिया ही मृत व्यक्तीच्या कुटुंबासाठी थोडी वेदनादायक असते. आग्नेय आशियातील ‘एम्स’ ही एकमेव संस्था आहे जी गेल्या दोन वर्षांपासून आभासी शवविच्छेदन करत आहे. रेडिओलॉजिकल तपासणीने डोळ्यांना दिसणारे फ्रॅक्चर आणि रक्ताच्या गुठळ्या शोधल्या जाऊ शकतात. मात्र आभासी शवविच्छेदनात अगदी लहान फ्रॅक्चर जसे की हेअरलाइन किंवा हाडांमध्ये लिगामेंटशी संबंधित फ्रॅक्चर तसेच झालेला रक्तस्त्रावदेखील कळतो. मृत्यूपूर्वीच्या जखमांची चिन्हे यात शोधली जाऊ शकतात. या गोष्टी एक्सरे फिल्म्समध्ये नोंदवल्या जाऊ शकतात’. या एक्सरे फिल्म्सना कायदेशीर मूल्य आहेत. असं डॉ. गुप्ता यांनी पीटीआयला सांगितलं.

…म्हणून मी अमिताभ बच्चन, राजू श्रीवास्तव यांनी केला होता खुलासा

कॉमेडी विश्वातील अनेक अभिनेत्यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. सुनील पाल हा अभिनेता राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांच्या खूप जवळचा होता. सोशल मीडियावर त्याने एक भावुक व्हिडिओ शेअर केला आहे. कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून भावुक पोस्ट लिहली आहे. तसेच राजू श्रीवास्तव यांचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शवविच्छेदनाच्या पारंपरिक प्रक्रियेतदेखील आता बदल होताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या