scorecardresearch

विश्लेषण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला लक्ष केंद्रीत करण्यासाठी सांगितलेले पसमंदा मुस्लिम कोण आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पसमंदा मुस्लिमांचा विशेष उल्लेख केला आहे

Pasmanda Muslims
(फोटो सौजन्य – AP)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी सामाजिक समीकरणे शोधण्यासोबतच पसमांदा मुस्लिमांवर लक्ष केंद्रित करण्याच्या भर देण्याची गरज व्यक्त केली आहे. भाजपाने समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे यावर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पसमंदा मुस्लिमांचा विशेष उल्लेख केला. पण पसमांदा मुस्लिम कोण आहेत? खरे तर देशातील एकूण लोकसंख्येच्या ८५ टक्के मुस्लिमांना पसमंदा म्हणतात.

पसमंदा मुस्लिम कोण आहेत?

 द वायरच्या मते, पसमंदा, ज्याचा पर्शियनमध्ये मागे राहिलेले असा अर्थ होतो. उत्तर प्रदेश, बिहार आणि भारताच्या इतर भागांमध्ये ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्याचारित मुस्लिम समुदाय म्हणून अशी व्याख्या पसमंदा मुस्लिमांची केली जाते.

भारतीय समाजात जशी जातिव्यवस्था आहे तशीच व्यवस्था आशियाई मुस्लिमांनाही लागू आहे. भारतात राहणाऱ्या मुस्लिमांपैकी १५ टक्के लोकांना उच्चवर्गीय किंवा उच्च जातीचे मानले जाते, ज्यांना अश्रफ म्हणतात. परंतु याशिवाय उर्वरित ८५ टक्के अरझल आणि अजलफ हे दलित आणि मागासलेले मानले जातात. मुस्लिम समाजात त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. मुस्लिम समाजातील वरचा वर्ग त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतो. ते आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वच बाबतीत मागासलेले आणि अत्याचारित आहेत. यांना भारतात पसमंदा मुस्लिम म्हणतात.

भारतातील पसमंदा चळवळ १०० वर्षे जुनी आहे. गेल्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मुस्लिम पसमंदा चळवळ उभी राहिली. भारतात ९० च्या दशकात पसमंदा मुस्लिमांच्या बाजूने दोन मोठ्या संघटना तयार झाल्या. ऑल इंडिया युनायटेड मुस्लिम फ्रंटचे नेते एजाज अली होते. याशिवाय पाटण्यातील अली अन्वर यांनी ऑल इंडिया पसमंदा मुस्लिम मेह नावाची संस्था स्थापन केली. या दोन्ही संघटना देशभरातील पसमंदा मुस्लिमांच्या सर्व संघटनांचे नेतृत्व करतात. दोघांनाही मुस्लिम धर्मगुरूंनी गैर-इस्लामी असल्याचे म्हणतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पसमंदा मुस्लिमांच्या छोट्या संघटना अधिक प्रमाणात आढळतात.

दक्षिण आशियातील मुस्लिमांमध्ये असा भेदभाव आहे का?

दक्षिण आशियातील देशांमध्ये, सामान्यतः सर्व मुस्लिम हे याच धर्मातून आले आहेत. पण मुस्लिम असूनही आजही त्यांना त्याच वर्गाचे समजले जाते. हिंदूंप्रमाणेच दक्षिण आशियाई देशांतील मुस्लिमांमध्ये वर्गव्यवस्था आणि जातिवाद अबाधित आहे. हे मुस्लिम सामान्यतः मानतात की त्यांच्या धर्मातच त्यांची उपेक्षा झाली आहे. त्यांच्या संघटनाही पसमंदा मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.

मुस्लिम वर्ण व्यवस्था कोणत्या तीन मुख्य वर्गांमध्ये विभागली गेली आहे?

भारतीय मुस्लिम देखील जातीवर आधारित व्यवस्थेचे बळी आहेत. ते सामान्यतः तीन मुख्य वर्गामध्ये विभागलेले आहेत. जे उच्चवर्णीय मुस्लिम आहेत त्यांना अश्रफ म्हणतात, ज्यांचे मूळ पश्चिम किंवा मध्य आशियातील आहे. या लोकांमध्ये सय्यद, शेख, मुघल, पठाण इत्यादींचा समावेश आहे. भारतात ज्या उच्च जातीचे लोक मुस्लिम झाले त्यांचाही उच्च वर्गात समावेश होतो. ते अजूनही मुस्लिम राजपूत, तगा किंवा त्यागी मुस्लिम, चौधरी किंवा चौधरी मुस्लिम, ग्रहे किंवा गौर मुस्लिम, सय्यद ब्राह्मण म्हणून ओळखले जातात.

यावरही पुस्तके लिहिली गेली आहेत का?

यावर दोन पुस्तके लिहिली गेली आहेत, जी भारतीय मुस्लिमांमधील दलित आणि मागासलेल्या स्थितीबद्दल विस्तृतपणे सांगतात आणि त्यात सुधारणा करण्याचे समर्थन करतात. अली अनवर यांचे मसावत की जंग (२००१) आणि मसूद आलम फलाही यांचे हिंदुस्तान में जात पत और मुस्लिम (२००७) ही पुस्तके आहेत. या पुस्तकांमध्ये मुस्लिम समाजात जातीचे वर्चस्व आणि प्रभाव कसा आहे, हे सांगितले आहे.

मुस्लिम संघटनांवर उच्च वर्गाचे वर्चस्व आहे का?

देशातील सर्व मुस्लिम संघटनांवर अश्रफ मुस्लिमांचे कसे वर्चस्व आहे किंवा देशातील सर्वोच्च मुस्लिम संघटनांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व कसे अतिरेकी आहे, हेही या पुस्तकांमध्ये सांगितले आहे. यामध्ये जमात-ए-उलेमा-ए-हिंद, जमात-ए-इस्लामी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, इदार-ए-शरिया इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया, मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन, उर्दू अकादमी आणि सत्ताधारी मुस्लिमांमध्येही अश्रफांची संख्या जास्त आहे.

मुस्लिमांमध्ये भेदभाव कसा?

मुस्लिम समाजात जातीवर आधारित अनेक स्तर आहेत आणि जातीच्या आधारावर भेदभाव कसा केला जातो हे ही पुस्तके सांगतात. यामध्ये खालच्या जातीतील मुस्लिमांना तुच्छतेने पाहिले जाते. ही व्यवस्था मशिदी आणि धार्मिक स्थळांमध्येही नमाज अदा करताना दिसून येते. खाजगी जातीच्या मुस्लिमांना मागच्या रांगेत स्थान मिळते. हीच व्यवस्था स्मशानभूमीतही लागू आहे. हा भेदभाव उत्सवांमध्येही दिसून येतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained who are the pasmanda muslims why pm modi wants to focus on them abn